श्री: सूक्ष्म प्रकृती
श्री: सूक्ष्म प्रकृती
सूक्ष्माच स्थान आपल्या जीवनात आहे; आपण त्यातूनच निर्माण झालो आहोत
आणि वावरतो आणि बदलत राहतो. हा स्वभाव प्रकृतीचा आहे जो सूक्ष्मात उद्भवतो (वृत्ती
घेऊन) आणि मावळतो. आपल्यावर पूर्णपणे ह्या प्रकुर्तीचा परिणाम होत राहतो आणि आपण
त्या नजरेने घटनांकडे बघतो, आकलन करून घेतो आणि निर्णय घेत राहतो आणि कार्य करतो.
प्रकृती असे काही विचार निर्माण करत राहते ज्यामुळे आपण चंचल राहतो, भीती वाटते
आणि काळजी वाटत राहते. ह्या भावनांचं उच्चाटन परिस्थितीत नाही आहे – मुळात
परिस्थिती ह्या भावनांमुळे निर्माण होते. म्हणून आपल मन शांत करणे हाच उपाय आहे
आणि ते तेव्हाच शांत होत जेव्हा आपल्याला अस्तित्व शक्तीची जाणीव होते आणि
सूक्ष्माची जाणीव होते.
उत्तर आणि कार्य, बुद्धीच्यामते, परिस्थितीत दडलेलं
आहे पण ती एका प्रकारची समज आहे किवा मनोरचना आहे. मनोरचना बदलली गेली तर अनुभव,
उत्तर बदलतील.
कुठल्या वेळी कुठल्या गोष्टींना (काळ आणि स्थान)
आपल्याला सामोर जायला लागत आणि आपण कुठल्या प्रकारे त्याकडे बघतो – हा सर्व मनाच्या
आत विचारांचा भाग आहे. आणि विचारांमुळे एका परिस्थितीशी, वृत्तीशी आपल नात घट्ट
होत आणि त्याप्रकारे अनुभव येत राहतात. त्यावरून आपण अंदाज बांधत राहतो कि कुठला
हेतू बरोबर आणि काय म्हणायचं होत एका व्यक्तीला? हे एका प्रकारे “चक्र” निर्माण
करत.
मुळ हेतू शोधणे किवा एखादा बिंदू शोधणे म्हणजे व्यर्थ
उद्योग आहे कारण तुझ किवा माझ अस काहीही वेगळ नसत, ज्यावरून ह्या सर्व
वृत्ती उद्भवतात. मुळात वृत्ती एका प्रकारे उद्भवतात म्हणून अभिमान निर्माण होतो जो
भेदभाव करत राहतो आणि विचार चक्रात गुरफटून बसतो. आपल्याला दुख का होत, राग का
येतो, अपराधीपणाची भावना का येते – हे सर्व मानविवृत्ती घडवून आणते म्हणून त्यावर
नियंत्रण करणे आणि आपण मुळात कोण आहोत हे समझणे महत्वाच ठरत.
गोष्टी होत राहतात आणि आपल्या आकलनाच्या पलीकडे असतात
ह्याचाच अर्थ कि देवाला सगळी काळजी आहे आणि तो सगळ्यांना तारुन घेईल. गोष्टी
आपल्या मनाप्रमाणे (विचार आणि भावनांच्या विशिष्ठ परिस्थितीतच) पाहिजे - अस अट्टाहास
धरणे म्हणजे अस्तित्वावर अविश्वास दाखवणे.
आपण अस म्हणू कि मला विश्वास आहे कि सूक्ष्म
प्रकृती (जि माझ्या मध्ये हि आहे; जि हे जग निर्माण करते; जि सगळीकडे
सारखेपणाने पसरलेली आहे) सर्व काही गोष्टी व्यवस्थित घडवून आणेल आणि योग्य तोच
अनुभव आपल्या समोर ठेवेल. त्या सुक्ष्मावर श्रद्धा ठेवा – आपल्याला बुद्धीच्या स्थितीवरून
जरी सूक्ष्म प्रकृती कळली नाही तरी “ती” आहेच आणि तीच कार्य चालू आहे
आणि ती अत्यंत प्रेमळ आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home