श्री
श्री
आपल्या आत खूप सूक्ष्म वृत्ती वावरतात ज्या एकत्र
येऊन, एकमेकात सरमिसळ करून विचार/ मन आणि शरीर घडवतात. हा निर्मिर्तीचा किवा
अस्तित्व शक्तीचा स्वभाव म्हणायला हरकत नाही आणि त्या स्वभावापोटी आपण बर्याच
मुल्याना घट्ट पकडून ठेवतो किवा सत्य मानत राहतो किवा आकार देत राहतो. ते मूल्य
सतत बदलत राहतात, म्हणून मन बदलत, शरीर बदलत, परिस्थिती बदलते, नाती बदल राहतात
आणि हे अनंत काळ चालू राहत. एकाबाजूला हा बदल आहे आणि दुसर्या बाजूला आपण म्हणू
शकतो कि आपण कुठल्यातरी वृत्तीना घट्ट पकडून ठेवतो, ज्या अनेक परिस्थिती निर्माण
करत राहतात किवा अनेक शरीर निर्माण करत राहतात ज्यामध्ये आतली मनोवृत्ती तशीच
राहते. म्हणजेच कि बदल हा वरवरचा आहे, आतली पोसली गेलेली वासना किवा वृत्ती जास्ती
सूक्ष्म, अदृश्य आणि स्थिरावलेली असते. तिथ पर्यंत पोहोचणे, म्हणजे आपण स्थिरावलो
तरच वृत्ती कळू शकते आणि आपण त्यातून शांत राहू शकतो. तीच वृत्ती बर्याच मनांमध्ये
आणि शरीरांमध्ये उपस्थित असते, म्हणून आपण त्या क्षेत्रात गेलो तर आपल्याला बर्याच
गोष्टींच आकलन होत. अति सूक्ष्म किवा परम्मुल्य भगवंतच आहे, जे आपण झालो तर सगळच कळल्यासारखा
होत.
सांगायच तात्पर्य आहे कि आपण आत कुठली स्तिती निर्माण
करत राहतो हे जाणणे म्हत्वाच आहे. प्रवास आतला आहे, बाहेर अनेक गोष्टी समजून
घेण्याचा नाही. कारण गोष्टींना निर्माण करणाऱ्या वासना आणि देणाऱ्या चालना आपल्या
मध्येच असतात. तिथपर्यंत भगवनताच नाम पोहोचू शकत.
नाम पोहोचणे म्हणजेच श्रद्धा वाढवणे सर्व घडामोडींवर.
एखादी कृती होत असतांना बर्याच वृत्तींचा समावेश असतो
म्हणून जे दिसतं राहत लोकांमध्ये किवा परिस्थिती मध्ये ते “घडवलेल” गेल असत –
त्यात ठोस अस काही कारण नसत – जे म्हणू तस जग निर्माण होत राहील किवा अर्थ निर्माण
होत राहील. “मी” निर्मितीचा एक भाग आहे – त्यातून अस ठोस कारण काहीच नाही.
भगवंताची इच्छा आहे म्हणून “मी” संक्रांत झालो. भगवंताची इच्छा आहे, म्हणून “मी”
वावरत राहतो आणि अनुभव घेतो आणि संपर्कात येतो जगाशी.
भगवंतावर श्रद्धा ठेवत रहा म्हणजे आपण शांत होऊ शकू.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home