श्री
श्री
माणूस आहोत म्हणून सतत काही प्रष्ण निर्माण होत
राहणार. प्रष्ण आहेत ह्याचा अर्थ कि आपल्याला अपूर्णत्वाची भावना आहे आणि आपली एक
मनोधारणा झालेली आहे. त्या रचने मध्येच वृत्तींचा समावेश – निर्माण होणे – आणि
त्याचा बदल आणि मावळणे हा स्वभाव असतो. स्वभाव म्हणल तर एखादी गोष्ट होत राहतेच,
त्याच्या होण्यामध्ये, बदलण्यामध्ये आणि मावळण्यामध्ये तसा कुणाच काहीच कर्तृत्व
किवा पाठींबा किवा संकल्पना नसतेच/ किवा नसावी. त्या पार्श्वभूमीवर आपलही कार्य,
कृती आणि अनुभव घडत राहतात. तरीही, त्या घडण्याच्या पाठीमागे जि सूक्ष्म शक्ति
कारणीभूत ठरते, तिच्या मध्ये “अहिमान” हि वृत्ती सुद्धा निर्माण होते आणि “अभिमान
विलयास होणे” हे हि विधिलिखित होत राहत.
आता अभिमान म्हणजे काय हे सूक्ष्म पातळीवर जाऊन
कळायला लागत. अभिमानाचा विस्तार फार, वृत्तीला चिकटण्याचा अट्टाहास कायम राहणे,
सतत बदलांच्या विरुद्ध बंड पुकारणे, सतत काहीतरी कृती करून “दाखवण्याचा” अट्टाहास
धरणे, विषयात गुंतून राहणे, बाहेर दृश्यात पळत राहणे, दृश्य जग निर्माण करत राहणे
आणि तेच सत्य मानणे वगैरे – अश्या निरनिराळ्या उपमा देता येतील त्या स्वभावाच्या.
त्यामध्येच “मी” अभिमानाला किवा त्या वृत्तीला संबोधित करतो आणि समजून घेतो कि
अभिमान आणि “मी” एकच आहोत. एखादी गोष्ट जेव्हा अनुभवायला येते, विचार निर्माण
होतात, भाव निर्माण होतात, शरीरानी कृती करतो, तेव्हा अभिमान कार्यारहित असतो.
निर्मितीमध्ये गोष्टी होत राहणे हे सत्य मानायला हरकत
नाही आणि त्या प्रभावाखाली आपण किवा आपली संकल्पना कार्यारहित होते. तर कुणी काही
बोलाल किवा दाखवल, किवा काहीतरी घडल तर आपण विचलित, दुखी किवा रागीट का व्हावं? आणि
बुद्धीने ह्यावर मात करणे शक्य आहे का? खर सांगायचं झाल तर मला माहीत नाही. आणि ते
“माहिती नसणे” हि भावन भीतीला उगवण्याच्या ऐवजी श्रद्धेला प्रकट करायला
कारणीभूत व्हायला हवी.
श्रद्धा म्हणजे “गोष्टी होत राह्णे” आपल्या आकलनाच्या
पलीकडे - हे स्वीकारणे आणि त्यातून आपली कारकिर्दी ठरत नसते किवा काहीतरी करून
दाखवण्याची गरज नसते, किवा अस्तित्व माननणे आणि एकमेव सत्य प्रेम हीच भावना प्रकाशणे.
दृश्याची पकड मनावर ढिली होणे गरजेच असत. ह्याचा दुसरा अर्थ असा कि हे होण्याकरता
काळ ह्या संकल्पानावर असीम श्रद्धा निर्माण करणे आणि सगळ्या गोष्टी असतातच किवा
निरंतर असतात हि जाणीव निर्माण करणे. आपल्याला कुठेही पळून जाता येत नाही किवा
काहीही धरून ठेवता येत नाही – कारण पळणे किवा धरणे ह्या संकल्पना अभिमानाच्या
आहेत, त्याला तसं काहीही ठोस कारण नाही. आपण शांत होणे म्हत्वाच आहे – ते भगवंताच्या
अस्तित्वामुळे आणि त्या जाणीवामुळे होणार आहे.
सध्या काळ आहे तो प्रचंड “घाई” अनुभवण्याचा. ते कस
चुकीच आहे - ते दाखवून किवा सांगून बदल लोकांमध्ये घडणार नाही. लोक वृत्तींच्या
आहारी गेलेले असतात आणि ते तशे का वागतात, हा प्रश्न स्वतःला विचारून पचवायला
लागतो आणि आपल्यामध्येच शांत राहण्याची शक्ति निर्माण करायला लागते. दुसरी गोष्ट
अशी कि ह्या प्रयत्नांमध्ये स्वतःच्या स्वभावाचा इतिहास आणि पुढची चाहूल हे
उपयोगात येतीलच अस काही सांगता येत नाही. भगवंत होण्यामध्ये किवा शांत होण्या
मध्ये किवा स्थिरावण्यासाठी कुठल्याच संकल्पानावर निर्भर राहता येत नाही. आपण
तरीही आहोत कुठलीही वृत्ती नसतांना – हे सत्य आहे. इतक मनाने मोकळ झालो कि भगवंताच
अस्तित्व सत्य वाटत.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home