श्री: विषय
श्री: विषय
शिक्षकांची तक्रार असते कि मुल त्यांची पाठ सोडत नाही
– सतत प्रश्न विचारत राहतात आणि शिक्षकांना त्रास देतात. वरवरच जरी हे विधान दिसतं
असल तरी खोल गेलो तर कळेल कि ते किती सुक्क्ष्म पातळीवर आणि विस्तारलेलं प्रकरण
आहे. त्या विधानाचा अर्थ असा कि माणसांना “विषय” सुटत नाही – किवा माणसं विषय
निर्माण करतात आणि त्यात गुंतून राहतात. त्यांना सांगितलं कि विषय खोटा आहे आणि
तात्पुरता आहे, तरी ते अमान्य करून त्या विषयात गुतून स्वतःचं नुकसान करून घेतात
आणि हे हि त्यांना कळत नाही. ते का कळत नसावं कारण सर्व विषयांचा उगम आणि आपण
त्याकडे कुठल्या नजरेने बघतो – हे सर्व खूप सूक्ष्म पातळीवर सुरु होत आणि आपल्यावर
प्रभाव करत. ते सांगून सुद्धा त्या वृत्तींचा फडशा पाडता येत नाही म्हणून त्यांना
कसं हाताळावं कळत नाही. ह्यामुळेच आपण त्रासलेल होतो आणि एकमेकांवर डाफरत राहतो.
वास्तविक हे सर्व विश्व, त्याच कार्य आणि बदल भगवंतच
निर्माण करतो, तर त्यामध्ये “तु किवा मी” आलोच कुठे?! म्हणजेच तु किवा मी ह्या
वृत्ती भ्रामक आहेत, तात्पुरत्या आहेत आणि अभिमान जागृत ठेवत राहतात. आपल्याला
उगीच वाटत राहत कि माझ्यामुळे सर्व गोष्टी होतात आणि मी जवाबदार आहे आणि मी अस केल
हवं; किवा तसं केल हव वगैरे. त्यामध्ये अनेक आकार येतात, परिस्थिती उद्भवत राहते
आणि आपण प्रतिकार करत राहतो. कश्यासाठी?
हे गुंतून राहणेच आपल्याला कळायला हवं कि ह्याचा उगम
कुठून होत आहे? विषय म्हणजेच आपल मन; म्हणजेच बदल, परावलंबन, वय, काळ, जागा, नाती,
ममत्व, अभिमान, अट्टाहास, निर्णय देण्याची घाई, सिद्ध करण्याची घाई, सांगण्याची
घाई, जाण्याची घाई, ज्ञान दाखवण्याची घाई वगैरे. हि कसली घाई आहे? आणि कुठल अस
ज्ञान दाखवायचय दुसर्याला? वास्तविक आपण स्वतःला वेगळे समझतो ह्यातच आपल्या
ज्ञानाचा दर्जा कळला! जिथे मुळातली समजूतच चुकीची आहे (पाया चुकीचा आहे), त्यावर
पुढची इमारत भक्कम कशी राहेल?!
आपण स्वतःला विषयातून बाजूला काढू शकत नाही आणि तस
केल तर हट्टा पोटी परत विषय निर्माण करत राहतो – असा जबर पगडा आहे वृत्तींचा मनावर.
आपण चुकत राहतो हे कळल्यावर प्रयत्न करणे जरुरीच आहे आणि त्यासाठी भगवंताची सतत
आठवण जागृत रहायला हवी.
सर्व करता तोच आहे आणि तोच सत्य आहे आणि तोच प्रेमाचा
उच्चांक आहे. त्याच्या स्वाधीन व्हा!
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home