श्री: उद्भवणे
श्री: उद्भवणे
गोष्टी घडण्यामागे अनेक बाजू असतात
आणि सर्वांच मुळ कारण बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे असत. हे दररोज आणि प्रत्येक
परिस्थिती मध्ये किवा प्रसंगात स्वतःला आठवण करून द्यायला लागते - कदाचित माझ्या बाबतीत “लिहिणे” आणि वाचन करणे
हे माध्यम असेल. जे सत्य आहे, ते स्वीकारणे आणि जे असत्य आहे त्याच्यावर काहीही
टीका न करणे महत्वाच आहे. सत्य आणि असत्य हा फरक तात्विक पद्धतीने आपण करतो म्हणजे
आपण सत्याकडे जाणारा प्रवास सुरु करु शकतो. तरीही आपण अस्तित्वात असतो कायम,
म्हणजेच निर्मितीच स्वरूप घेऊन वावर करत असतो. त्या निर्मोती मुळे अनेक वृत्ती,
विचार, भावना “आकारास” येत राहतात आणि त्या आकारांना आपण प्रतिसाद देत राहतो.
हे सगळ्या गोष्टी कश्या होत राहतात
आणि त्याचं एकमेकांशी काय संबंध आहे आणि तो सांगण्यासारखा आहे का आणि तो कळेल का
आणि त्यावर कुणी सहानुभूती दाखवेल का – सगळे प्रश्न मला पडतात. त्यावर काहीही
उत्तर नसतं आणि त्यामुळे अनेक वर्ष कदाचित मी बेचैन असायचो आणि वाटायचं कि ह्या
मनातल्या प्रश्नाचं उत्तर बाहेर “वस्तूंच्या हालचाली” मध्ये असेल. मुळात प्रश्न
खोलवर आहे – वृत्ती उद्भवण्याचा आहे आणि “मी” निर्माण होण्याचा आहे आणि त्यावरून
आपण विचार कसे करत राहतो ह्यावर आहे. तरीही
प्रकरण गूढ आणि पुसटस कळत राहत आणि काहीतरी सतत बदलत राहतंय आणि निसटतय आणि आपण तात्पुरतेच
राहणार आणि परिस्थितीवर अवलंबून राहणार हि भावना राहते.
त्या भावनेचा उगम खूप खोल ठिकाणी
आहे आणि ती भावना जरी “जागृत” झाली तरी आपल्याला काळजी करण्याच कारण नाही. ती
भावना भगवंताने दिली आहे, जि आपल्याकडून कार्य घडवत राहते आणि त्या भावनेमुळे आपण
भीती आणि राग बाळगतो आणि असहाय झाल्यासारखं वाटत राहत.
शांत राहणे म्हणजे ह्या सर्व
गोष्टींच आकलन होणे आणि त्यावरून आपला मुळ स्वभाव जाणून घेणे. कुठलीही कृती आणि
विचार आणि गोष्ट खूप सूक्ष्मातून आणि विशाल पातळीतून येत असते – त्याला “थोडक्यात”
आणि “बिंदूत” उत्तराची अपेक्षा करून चालत नाही. म्हणजेच कि आपण सर्व शांत भावनेने
स्वीकारतो. आपण नाही – सूक्ष्म शक्तीच अस्तित्व खरं आहे. ती शक्ति कळणार नाही,
कळायला वेळ लागेल, ती सांगता येणार नाही, ती काय आहे हे दुसर्यांना कळणार नाही –
पण आपण पूर्णपणे त्या शातीवर निर्भर असतो.
सूक्ष्माच महत्व एवढच कि आपण कोण
आहोत हे स्वीकारतो आणि गोष्टींच्या उद्भवण्याला आपण स्वतःला त्रासिक करून घेत
नाही. आपण अपुरे राहतो पण तोच जीवनाचा स्वभाव असल्यामुळे आपण स्वतःला दोष देण्याच
कारण नाही. हे एकदा मान्य केल कि आपण शांत होऊ लागतो. म्हणून स्थळ, काळ,
परिस्थिती, अनुभव, वृत्ती, विचार, भावना, नाती, लोक समूह, जीव – ह्या कुठल्याच
अपुर्या गोष्टींवर “आपण” किवा आपल “अस्तित्व” ठरण्याची गरज नाही. सर्व भगवंताच आहे
– त्याला परत सर्व द्यावे आणि विलीन व्हावे!
श्रद्धा ठेवा.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home