Tuesday, September 19, 2023

श्री

 

श्री

संकल्पना खूप सूक्ष्मातून उद्भवत राहते आणि ती बुद्धीवर आणि अनुभवांवर आणि जगावर ताबा घेते. मुख्यतः संकल्पनाच मूळ वृत्तीतून निर्माण होत असते आणि ते ही भगवंताच्या अस्तित्वामुळे किवा त्याचाच शक्तिमुळे. हि शक्ति कायम स्थिर असते पण कार्य घडवते आणि भास निर्माण करत राहते आपल्या मनात आणि आपण सुद्धा त्यामध्ये निर्माण होत राहतो. तेच तेच करत राहतो आणि विचार चक्रात अडकतो. तर आपण गुण पदरात पाडून आलो आहोत आणि त्यात वावरत आहोत.

आज जेव्हा मी आई आणि बाबांचं बोलणं ऐकत होतो तेव्हा जाणवल कि भूतकाळाचा जोर किती असू शकतो – ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्याला पकडून आपण आपल अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः बाबांचं पूर्वीचं कार्य आणि एक एक टप्पे त्यांना अजून अस्तित्वाची जाणीव करून देतात (ते अनुभव सोडवत नाहीत आणि ते अनुभव आत्ताची परिस्थिती त्यांना स्वीकारण्याची कदाचित शक्ति किवा बळ देतात)  - आता कुणी सांगाव कि हे विचार खोटे आहेत आणि भूतकाळात का आपण जगावं?! म्हणजे भूतकाळ किवा भविष्यकाळ – ह्या संकल्पना खूप प्रखरतेने आपल्या मना मध्ये परिणाम पाडू शकतात किवा आपण परिणाम पाडून घेत राहतो. आपण त्यांना चिकटून राहतो आणि त्या बदलत्या वृत्तीन्मधून वेगवेगळ्या संकल्पना निर्माण करत राहतो ज्यामध्ये बदलणारे किवा भासणारे चंचल भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ निर्माण होतो. तीच परिस्थिती आईसाठी वेगळी आहे – ज्या गोष्टी बाबांना घट्टपणे धरून ठेवायच्या आहेत, त्याच गोष्टी आईला सोडून द्यायच्या आहेत आणि त्या कदाचित सोडण्यामध्येच “पुढे जाणे” ठरत असेल तिच्यासाठी.

माझ जर विचारलं तर त्या दोघांच्या अनुभवामध्ये मी घर का ना घाट का! बाजू घेणे ह्या मध्ये काही अभिप्रेत आहे का?! आपण दुखावतो तेव्हा मन, संकल्पना, विचार, त्यामागच्या गोष्टी, भासलेल स्थान मिळत नसावं किवा धीक्कार्ल जात असावं. म्हणजेच कि आपण खूप विचारांना चिकटून राहतो आणि अट्टाहास बाळगतो.

जस आई बाबांचं होत, तसं माझ्या बाबतीतही होत असेल – नाकोत्या गोष्टींचा विचार करत रहाण, संकल्पना करण कि उद्या सर्व ठीक होईल, निर्णय देत रहाण संकल्पनेतून, आणि तेच तेच विचार आणि समजुती बाळगत रहाण. म्हणजेच कि आपण ज्याला खरं मानत राहतो, त्याला चिकटून राहतो आणि काहीही झाल तरी मागे हटत नाही!

ह्याचाच अर्थ कि आपण काहीही निर्माण करू शकतो आणि त्याला सत्यपणा देऊ शकतो. मग प्रश्न असा उद्भवतो कि “सत्य” काय आहे? सत्य हे अस्तित्व आहे. ते आहेच, अनंत आहे, स्थिर आहे, एकमेव आहे. ते बनायला शिकायला पाहिजे. ते बनत जाणे म्हणजे श्रद्धा वाढवणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home