श्री: गणित
श्री:
गणित
मी एका
संकल्पनेत वावरत आहे आणि ती श्री साठी अर्पण करावी कारण ‘मी’ होतो किवा निर्माण
झालो आहे. विचार कशे येतात, बदलत राहतात आणि कुठला क्षण अनुभवायला आणतात – हे कुणी
सांगाव?! किवा विचार आणि भावना आहे तरी काय?
त्याच
स्पष्टीकरण आपण देऊ शकू (आणि ते अध्यात्म मध्ये दिलेलं आहे) पण स्पष्टीकरण देणे हि
एक ताकद आहे, त्याच ओझ असत. ते पेलवता येत नसेल तर स्पष्टीकरणाच्या फंदात न पडलेल
बर आणि जे काही अनुभव येत आहेत त्याला पूर्णपणे स्वीकारण्याची भावना निर्माण करणे
शहाणपणाच ठरत. स्पष्टीकर्णामुळे सुरवात होते कि अनुभवातून (भावनेतून)? एखादी गोष्ट
पूर्ण स्वरुपात बौद्धिक दृष्ट्या माहीत होते कि भावनिक दृष्ट्या का दोन्ही? “जाणीव
होणे” हि क्रिया कुठल्याही मार्गातून होत असतेच – ती कमी-जास्त प्रमाणात बौद्धिक,
भावनीक आणि शारीरिक माध्यमातून होते आणि प्रत्येकाचा मार्ग (किवा पिंड) वेगळा असतो
आणि तो एकमेकांमध्ये मिसळलेलाहि असतो. म्हणून ह्या सर्व विचारांना तसा ठोस उगम
नाही किवा बिंदू नाही.
हे ध्यानात
आल, कि कुठलाही विचार “आपला” म्हणून जाणवू शकत आणि त्या विचारांमधून एक
अस्तित्वाची कल्पना रचली जाऊ शकते. किवा विचार येओ, बदलो आणि मावळो – त्यावरून आपल
काही म्हणण अवलंबून नसत. थोडक्यात विचार आणि सत्य मी – हे वेगळ्या गोष्टी आहेत.
तरी हि
जाणीव येण्या करता असंख्य जन्म आणि प्रयत्न करत राहणे महत्वाच ठरत असावं.
आज अस
वाटल कि न बोलणे किवा सगळ स्वछ दिसणे किवा वेळेवर पटापट गोष्टी होणे – ह्याला काही
खरच अर्थ आहे का? सुंदर वाटणे किवा शांत वाटणे आणि कश्याही घडामोडी होणे हे चालु
शकत. ठराविक पद्धतीने कामं होणे किवा जगणे म्हणजेच सुख उपभोगणे - हे काही गणित
नाही. जीवन गणितासारख जर केल तर त्याची वाट लागू शकते. हे अत्यंत चुकीच आहे कि आपण
स्वतः आणि घडामोडी गणितातमक मांडू पाहतो – त्याने नुसता त्रास पदरी पडतो.
गणित आलं
रे आलं कि गूढत्वाचा झाला बट्याबोळ! आणि कदाचित अहंकार म्हणजे गणिताच्या आधारावर आयुष्य
बघणे (अट्टाहास) आणि कला किवा गूढ पद्धतीने आयुष्य जाणवणे म्हणजे संत होणे. त्याची
किंमत आहे स्वाभाविक. ती किंमत आहे गणित सोडणे. जे होत आहे ते भगवंताच्या इच्छेने
होत आहे हि भावना वाढवणे आणि श्रद्धा ठेवणे.
Maths is for fools - a very narrow minded approach.
Life works in mysterious ways.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home