श्री
श्री
प्रत्येक
क्षण तुम्हाला कळो अथवा ना कळो, तो भगवंताच्या इच्छेने आला आहे आणि बदलणार आहे. आपली इच्छा त्याच्या
इच्हेतून वेगळी नसते (ती वेगळी होऊ शकत नाही/ तिला अस वेगळ अस्तित्व नाही आहे),
म्हणून कुठल्याही परिस्थितीचा अनुभव, होणे, बदलणे, जाणे हे सर्वस्वी त्याच्या
कार्यातून होत असत.
परिस्थितीच
ज्ञान संपादन करणे (प्रापंचिक दृष्ट्या) म्हणजे जर-तर च्या चक्रात अडकणे आणि बिंदू
वर लक्ष केंद्रित करण्याचा अट्टाहास करणे. त्याच उत्तर बुद्धीला मिळत नाही आणि
म्हणून मन अस्वस्थ राहत. कारण बुद्धी आणि कुठलीही ‘गोष्ट’ निर्माण झाली आहे – तिचा
एक स्वाभाव आहे, परावलम्बिक प्रकरण आहे,
जर-तर आहे, बदल आहे, आणि एक स्थिती आहे. हे ध्यानात यायला हव, म्हणजे हेतू, कृती,
व्यक्ती, दृश्याचा अर्थ, आकलन, विचार, पूर्व ज्ञान आणि भविष्य ज्ञान, वृत्ती,
सुरुवात, शेवट, स्तर - ह्या संकलपांच्या
पलीकडे जाणे/ होणे.
मी का
लिहितो? मला नाही ठाऊक; किवा भगवंताची इच्छा. अस आपल्याला सर्व बाबतीत जाणून घेता
येईल का? आणि हे हि लिहितांना कुठल्या हेतू आत वावरत असतील ह्याचा पूर्ण ठाम पत्ता
कुठे ठाऊक मला? म्हणजे कुठलीतरी शक्ति आपल्या आकलनाच्या पलीकडे काहीतरी विचार, मन,
व्यक्ती, परिस्थिती “निर्माण” करते. एका विशीष्ट सरमिसळ स्तरांमुळे आपल्याला
सध्याची बौद्धिक जाणीव उत्पन्न होते. ती जाणीव एक स्वाभाव घेऊन वावरते (स्वाभाव = अनंत
चक्र) आणि अनेक संकल्पना निर्माण करत राहते आणि आपल्याला सैर्बैर करते.
आपण
कश्याला घाबरतो? मुळात घाबरणे तरी काय भावना आहे? आणि ती निर्माण का होते? आणि तीच
रुपांतर स्वछ प्रेमात होऊ शकेल का? ह्याच उत्तर काय असावं? कसं शोधाव?
मला वाटत
कि जिकडे वृत्ती प्रमाणे आपण वागत सुटतो, ते अभिमानाला कारणीभूत ठरत आणि सगळे आकार
वेग-वेगळे वाटायला लागतात आणि तसच आपल वर्तन होत जात. जेव्हा अशी जाणीव उत्पन्न
होते, ती आपल्याला जन्मास घालते आणि आपण शुद्ध अस्तित्वाला ‘विसरतो’ (म्हणजे की
कुठल्यातरी भलत्याच संकल्पनेला चिटकून राहतो). त्या भलत्याच संकल्पनाचे परिणाम
म्हणजे अहंकार आणि भीती. गारवा जसा नितळ पाण्याला “गोठून” बर्फ करतो, तसं भगवंताला
“गोठून” आपण जीव म्हणून जन्मास येतो. ह्याचाच अर्थ असा कि आपल्या आत भगवंत गोठलेला
आहे – त्याची शक्ति सुप्त रुपात आहे. ती शक्ति प्रज्वलित करून आपण परत नितळ पाणी
व्यायच असत.
सार
दृश्य जग अस गोठलेल्या अवस्थेत दिसतं राहत जिथे आपला अनुभव आणि प्रक्रिया त्या
प्रमाणे हालचाल करत राहतात आणि सत्य स्वरूप झाकून टाकतात.
गोठणे हि
क्रिया अहंकारामुळे येते आणि विलीन होणे हि क्रिया प्रेमामुळे येते. संत म्हणतात
कि नामस्मरणाने आपली गोठलेली अवस्था शेवटी भगवंतामध्ये विलीन होते.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home