Tuesday, November 14, 2023

श्री: गती आणि श्रद्धा

 

श्री: गती आणि श्रद्धा

श्रीची शक्ति खूप सूक्ष्म, दृश्यातीत आणि अनंत असते – तिचा परिणाम कसा होत राहतो आकारात हे सांगता येत नाही किवा पूर्णपणे कळत नाही आपल्या मनाला. म्हणजे शुद्ध अस्तित्वाची उपस्थिती आणि परिणाम आणि आपला हेतू हे वेगळे भासत राहतात म्हणून श्रीची उपस्थिती आपल्या असण्यामध्ये कळत नाही. तरीही अट्टहास करून ती हाती लागेल अस काही ठोसपणे सांगता येत नाही. जे होतं ते चांगल्यासाठी होत असत हि भावना आत निर्माण करायला हवी. चांगलं म्हणजे जि काही गती अनुभवायला मिळते, जो काही बदल दिसतं राहतो, जे काही कृत्य असंख्य आकार करत राहतात, त्या मध्ये भगवंत विराजमान आहे, दुसरा-तिसरा कुणीही नाही.

गती किवा प्रारब्ध किवा अनुभव किवा बदल – ह्या गोष्टी सारखे आहेत – तसे ह्या गोष्टी निर्माण होत राहणार आणि बदलत राहणार – त्यातून आपली कारकिर्दी, विचार, हेतू, असण्याची काही गरज आहे का? गतीतून आपण ठरत नाही आणि स्वतःबद्दलच मत निर्माण करण्याची गरज नाही. म्हणजे कि निर्माण होणे हि एक प्रकारची क्रिया आहे, कार्य आहे जे कुणावरही अवलंबून नाही – ती होत असते. हे पचनी व्हायला हव आणि त्याचाच असतो अभ्यास.

श्रद्धा हि एक मोठी शक्ति आहे जि आपल्याला वरील सत्याकडे आणते. श्रद्धा अंगी बाणायला जो वेळ लागेल तो आपण देऊ या. ती कशी, कुठे आणि कुठल्या परिस्थितीत निर्माण होईल ते देवावर सोडणे. आपण फक्त त्याची आठवण सोडू नये.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home