श्री,
एका
प्रक्रियेतून "मी" ही भावना (किंव्हा भाव) निर्माण होत राहतो. ती
प्रक्रिया खूप, खूप खोल आणि विशाल भूमिकेतून कार्यकारण संबंधातून निर्माण होते आणि
दृश्यात येते, मग जग दाखवते, अनंत आकार
दाखवते, बदल घडवते, विचार चक्र आणि
भावना चक्र निर्माण करते, गुंतून ठेवते, अस्वस्थ करते, अनुभव देते....ह्यात मग
"मी" कशाला म्हणायचं?! का ह्याला आपण _चुकून_ "मी" समजतो?!
ह्या
प्रक्रियेत आपण ज्या स्थितीत असू, त्या स्थितीतून उद्भवलेल्या विचार चक्रातून आपण "मी" ला
संकल्पना देतो. त्यात "विश्वास" ही भूमिका येते. म्हणजे जे दिसतं,
जाणवत, स्थळ आणि काळात येतं, त्यावरून आपण निर्णय घेत राहतो. म्हणून अश्या विचारांना एक मर्यादा येते
ज्याला _विश्वास_ आपण म्हणू शकतो.
साहजिकच अनाकलनीय गोष्टी आपल्या पचनी पडणार नाही किंव्हा जी संकल्पना स्थळ आणि
काळाच्या पलीकडे असते, तिच्या बद्दल अनेक प्रश्न आणि शंका
घेत राहू. त्यावरून भीती ही भावना आपण निर्माण करतो आणि कुठलिका भावना असेना,
ती आपल्यावर परिणाम पाडत राहते, मग तो अहंकार
असू दे किंव्हा राग...
मूळ
शोधण्याचा प्रयत्न करतांना प्रवास उलट्या आणि विशाल स्वरूपाचा उलगडतो. म्हणजे
वस्तू मधून जाळ मधून बदल मधून अनंत मधून वृत्ती मधून स्थिरता.
अत्यंत
शुध्द आणि दिव्य स्थितीतून कष्ट करण्याच्या हाऊसेपोटी दृश्य जग आणि आकार निर्माण
होत. प्रत्येक गोष्टीचा उगम हा दिव्य आहे, ह्यावर श्रद्धा ठेवा. श्रद्धा म्हणून शुध्द
स्थितीतून येत असते आणि ती त्या प्रमाणे विचार घडवते.
The
origin/ centre/ creation of everything is Divine. If one inquires what is
divinity, then the answer to this question is that coming to a _centre_ means
to _become_ divine. This centre is not seen through eyes, or does not mean a
geometric centre or anything having a periphery and a centre kind of a polar
idea. Centre is an existential state of being.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home