श्री,
त्रास ही
वस्तू नाही, ती वृत्ती आहे. कुठलीही वृत्ती मनात येते, पसरते,
विस्तार पावते, रूप बदलते, अनेकात संबंध ठेवते आणि शेवटी दृश्य जग भासवते. वृत्तीवरून अनेक विचार आणि
भावना येत राहतात आणि आपण "मी" ची संकल्पना जोडतो, अर्थ मांडतो, तसे वागतो. ह्यात "मी" कुठे
आहे मग?! विचार केला तर "क्रिया मधून _मी_ _निर्माण_ होतो"
किंव्हा तसा भाव जन्म घेतो आणि त्यात मग "आपण गुंतून राहतो"!
त्या
पार्श्वभूमीवर, "मी" बदलू शकतो आणि सत्य होऊ शकतो. एकदा पचनी पडलं की चक्र म्हणजे काय
आणि त्या चक्रामुळे एक "स्वप्नं" (दृश्य जग) आपण तैय्यार करतो, तर त्यातून जागं होण्याचा मार्ग ही उपलब्ध असावा. तर तो आहे कारण मानव
योनीत ती शक्ती दिली आहे, जी विचार करेल, अर्थ लावेल, दुःख सोसेल पण शेवटी सत्याकडे येईल.
हा
प्रवास करणे म्हणजे भक्कम निर्णय घेण्यासारखे आहे आणि त्या वाटेवर जे काही होईल, ते स्वीकारणे असं
आहे. वाट सरळ नाही, आड मार्गाची असावी, त्यात बऱ्याच गोष्टी होतील, तरीही खोल आत डोकावून
शांत होत राहणे - हाच प्रवास आहे.
No one
is expecting anything from us... expectations are only self made constructs.
There is no such thing as the "other" since there is no such thing as
the "self" in absolute terms. Of course, it takes time to realise
this relationship and in no way is any pessimism suggested here.
For our
sake, we have created a concept of God as a _representation_ of the
Truth. And perhaps this is the biggest gift we have. A concept to
transform us and go beyond the concept itself.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home