Thursday, May 16, 2024

श्री

 श्री,


आपल्याला एक शक्ती दिली आहे अस्तित्वाने ज्यावरून आपण विचार, भावना आणि कार्य निर्माण करत राहू शकू. निर्माण करणे हा अस्तित्वाचा गुण धर्म आहे आणि त्यातूनच सर्व काही होत राहत - आपण देखील. ते अनंत काळ होत राहील. 

म्हणजे शक्तीला अनुसरून कार्य करायला पाहिजे, मग ज्याच्याकडे कुठलीही गुणधर्माची शक्ती असेल ती वापरावी. आता ही शक्ती मला का दिली, असं विचरण्यापेक्षा, ती कशी वापरावी, ते ओळखणे महत्वाचं आहे. Never doubt what we have inherited, why we are here, what we are becoming and where we are going....for that is God's thinking, the origin of which only He knows. 

माणसाला वाटतं की बदल ताब्यात हवे, सुरक्षितता हवी, म्हणून घरदार, मुलबाळ, नातीगोती, स्वभाव, कृती, वस्तू ह्यांचा आधार घेत राहतो. ह्यासाठी शक्ती खर्च करून शेवटी असमाधान अनुभवतो! कारण अस्तित्वाचा हेतू काय आहे, हे नीट कळलेलं नसतं. असो, त्याला काही हरकत नाही. आपण अस्पष्टतेतच सुरुवात केली आहे, असे स्वच्छ मनाने स्वीकारावे. 

नंतर प्रवास योग्य कसा होईल, ते पाहावे. उचित गोष्ट त्वरित कधीच होत नाही, कारण त्याच्या आड बऱ्याच गोष्टी उफाळून येत राहतात. हे ही होणार. अस्वस्थता वाटेल, चिंता राहील, त्रास होईल....सर्व होऊ द्यावे. कारण त्यातून प्रवास कसा घडवला पाहिजे हे उमगत जाईल. 

श्रद्धा प्रकट करा.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home