Thursday, May 09, 2024

श्री

 श्री,


मागे काय झालं आणि कसं झालं आणि पुढे काय होईल, हा प्रश्न स्वतः बद्दल, इतरान बद्दल, परिस्थिती बद्दल आणि स्थळ - काळा बद्दल असतो. म्हणजे असे विचार येणार, वृत्ती उमटणार आणि ते एका प्रकारे अनुभव देत राहणार. 

आपल्याला उगाचच असं वाटतं राहत की असं केलं किंव्हा तसं केलं असतं त्या परिस्थितीत/ वेळेत/ स्थलात तर योग्य ठरलं असतं. ते भ्रामक आहे. आयुष गूढ आहे, आणि ते विचार चक्राच्या पलीकडे त्याचं माहात्म्य आहे. 

म्हणून गोष्टी होणे, बदल दिसणे, गती असणे, अनुभव निर्माण होणे हे विचारांच्या बळावर होण्याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठल्यातरी शक्तीवर आधारलेलं असावं. विचारांच्या हातात गोष्टी नाही आहेत, हे उघड आहे पण आपण ते मान्य करण्यात हिम्मत आणि नम्रपणा दाखवत नाही. आपल्याला भीती वाटते आणि त्याच कारण कळत नाही, हे मान्य करण्यात कुठला न्यूनपणा आला?! आणि ते झाकण्यात दुसऱ्यांवर डाफरण्यात कुठला शहाणपणा आला?!!..आणि असं होऊन सुद्धा आपण हेतूनवर बळी का पडतो, हे तर आणखीनच गूढ प्रकरण आहे!

असो, जग ह्याला मानत असतील. मग कुणाला सुधराव?! उत्तर उघड आहे - स्वतःला, कारण त्यातून आपण जग निर्माण करतो. आणि त्यातून श्रद्धेचा उगम होत असावा, की ताबा मिळवणे हा अट्टाहास सोडावा, " मी " ही वृत्ती सोडावी/ शांत होऊ द्यावी. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home