Thursday, May 09, 2024

श्री,

 श्री,


अध्यात्म हे जाणीवेच शास्त्र असावं. म्हणजे अस्तीत्व ही शुध्द जाणीव आहे. त्यातून जाणिवांचे अनेक स्तर निर्माण होतात आणि ते संबंध, बदल, आकार दर्शवतात (किंव्हा त्याला दृश्य "स्वरूप" मिळतं). थोडक्यात आकार बघितला तर एका जाणीव स्तराच चिन्ह आहे. त्या स्तरावर जाणीव आहे म्हणून आकार दृश्यात येतात किंव्हा त्या जाणिवेचा स्वभाव असा आहे की तो दृश्य दर्शवतो! म्हणजेच की आकार ही वस्तू नसून ती जाणिवेची अवस्था आहे किंव्हा ज्याला "वस्तू" म्हणून मान्य केलं आहे, ती मुळात जाणीव आहे! 

ह्यातून हे सिद्ध होत की सर्व वस्तूंमध्ये/ आकारांमध्ये जाणीवा असतात आणि ते आपल्या मनाशी गुंतलेले असतात. म्हणून आपली कृती आकार निर्माण करते आणि इतर आकरांवर परिणाम पाडते. 

आपल्या जाणीव स्थराला "देहबुद्धी" म्हणतात. हा झाला एक स्वभाव/ स्तर. त्यातून बदल, आकार भासत राहतात आणि सुख, दुःख, त्रास, चिंता आपण भोगतो, कारण त्याचा स्वभाव तो आहे. 

जाणीव जशी सूक्ष्म होते, तसे वेगळे स्तर आणि त्यांचा परिणाम आपण अनुभवतो. शेवटी जाणीव शुध्द झाली, की सत्य प्रकट होत. 

ह्या क्रियेला उर्ध्वगती साकारणे असं म्हणतात. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home