Wednesday, May 22, 2024

श्री

 श्री,


द्वैत ही अस्तित्वाची स्थिती आहे. अस्तीत्व बऱ्याच स्थितीत "जाणवत" - त्यात द्वैताच्याही बऱ्याच स्थिती आहेत. 

एकच अस्तीत्व आहे, त्यापासून "वेगळे होणे/ वाटणे/ जाणीव असणे" म्हणजे द्वैत किंव्हा जीव. बऱ्याच क्रिया मधून "वेगळेपणा उद्भवतो" , त्यात वृत्ती, प्राण, मन, शरीर, दृश्य, आकार, परिस्थिती, बदल ह्या गोष्टींची _निर्मिती_ असते (किंव्हा तात्पुरते येतात/ दिसतात आणि जातात). ह्या द्वैताचा "उगम" म्हणजे आतील वृत्तीची चलबिचल/ निर्मिती/ होणे. त्यामुळे "मी" , "जग" आणि "भगवंत" ह्या संकल्पना जाणवतात. 

जिथे आपण सध्या आहोत, तिथून आपला संबंध जगाशी आणि भगवंताशी ठरतो. पण हा झाला मांडण्यासाठी फक्त विचार, किंव्हा शब्दांची जुळवाजुळव. ह्या अखंड क्रियेतून भावात परिवर्तन होत राहत आणि त्या प्रमाणे जाणीव घडतात आणि आपण अस्तीत्व अनुभवतो. इतक्या घट्टपणे मनात गोष्टी असतात. 

साठवण्यानी गोष्टींचं समाधान उद्भवत नाही. किंव्हा वासना तृप्त करून घेण्यातही समाधान लाभत नाही. दृश्याचा स्वभाव (म्हणजे अहं वृत्तीचा स्वभाव) असा आहे की कपाटात गच्च वस्तू भरले की समाधान मिळेल. वस्तू मिळवणे किंव्हा वासना तृप्त करणे हे गुंतण्यात राहण्याचे लक्षण आहे. एक वस्तू मिळवण्यासाठी अनेक प्रयास करायला लागतात आणि त्यातून दुसऱ्या वस्तूच बीज त्यातच असतं! वासनाची तीच तऱ्हा आहे.

म्हणून मार्ग असा हवा की कुठलीही वस्तू किंव्हा वासना नसतांना सुद्धा आपण आनंदी आहोत, शांत आहोत. काहीही निर्माण होत नसतांना देखील आपण पूर्ण आहोत.

हे भगवतस्वरुप झाल्याशिवाय जाणवणार नाही.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home