श्री
श्री,
जाणीव आणि विचार ह्या मध्ये फरक आहे. जाणीव ही अस्तित्वाच्या शक्तितुंन येते, जीची सुरुवात भगवंत आहे आणि शेवट म्हणजे तात्पुरते आकार). ह्या परिवर्तन क्रियेत कधीतरी "मानवी विचार" तैय्यार होतात. विचारांच्या बळावर एक स्थिती दिसते, सत्य त्याच्या पलीकडे आहे. म्हणून विचार करून पूर्ण सत्य हाती लागतं नाही आणि ते साहजिकच आहे. त्यांनी त्रासून जायचं कारण नाही.
विचार "नंतर" झाले आहेत, हे स्वीकारलं, तर सर्व उत्तर, बदल, क्रिया, हेतूच उगम, शक्तींचा वावर आणि समावेश, हे "स्वीकारणे" आलं बिना शंका घेता. म्हणजे अस्तित्वाची प्रक्रिया काय आहे आणि परिणाम काय आहे, ते माहीत नाही, पण ती होते हे नक्की.
विचार किंव्हा कुठलीही स्थिती ही एक चक्र आहे - एकच मध्यामाच रूप आहे म्हणून गुंतलेलं आणि अनंत काळ चालून आलेलं आहे.
प्रतिभा ही विचारांच्या पलीकडे असते, जीच्यातून विवेक येतो. आपण प्रतिभेने वागावं. दृश्य आणि आकार विविध जरी भासले, तरी त्याची प्रतिभा एकच सत्य आहे. म्हणून वेगळेपणा ही स्थिती आहे, सत्य नाही. आणि सत्य जर जाणून घ्यायचं असेल तर ते एकच आहे, ज्यामधून अनेक रूपं निर्माण होत राहतात. जसे ते निर्माण होतात त्यात विघटन क्रिया होते, आणि त्याच वेळेस गुंता किंव्हा त्यातील संबंध तैय्यार होतो. म्हणून आपण कितीही "घसरलो" तरीही इतर स्तरांशी संबंध कायम राहतो आणि त्या बळावर आपण भगवंता पर्यंत पोहोचू शकतो. त्याचा संबंध आपल्या जाणीवेशी निश्चित आहे, तो काय आहे हे प्रत्येकाने तपासून घेणे.
रस्ता चालतांना काही शेकडो मैलावरची गर्दी आपल्या स्थानावर परिणाम पाडते आणि आपल्याला हळू किंव्हा वेग बदलायला लावते. आपली नजर कुठे सुरुवात होते ह्याकडे नसेलही, पण त्याने परिणाम आपल्या स्थानावर होण्याचं थांबत नाही.
तसच आपला जीवनाची स्थिती आणि प्रवास एकच शुध्द अस्तित्वाच्या शक्तितुन येत राहतो आणि त्या अस्तित्वाचा परिणाम आपल्या जीवनावर पडतो/ उमटतो, हे ध्यानात राहू दे.
आपण द्वैतात का झालो, काय घेऊन आलो आहे, आणि कसे संबंध जोडले गेले आहेत, हे विचार करू शकू पण त्याने भगवंताच दर्शन होईल असे नाही - त्याला श्रद्धा ही जोड लागते. संबंध नकळत होतात आणि ते खूप सूक्ष्म रूपातून झाले असतात, म्हणून कधी तरी त्रास, चिंता, दुःख हे होणार, त्याला कुणी थांबवू शकतं नाही - किंव्हा थांबवूही नये जर तसा अस्तित्वाचा नियम असला तर...
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home