Saturday, May 04, 2024

श्री: भाव

श्री,

गोष्टी भगवंता कडून होतात, त्यांची निर्मिती, उत्पत्ती, विलीन होण्याची क्रिया. आणि हे कार्य, ज्याला भगवत भाव शिवाय दुसरा कुठलाही हेतू नाही, अनंत काळ चालू आहे. त्याच भगवत भावाला _अस्तीत्व_ संबोधित केलं आहे.

आपल्याला ह्या भावनेत स्थिर व्हायचं आहे. साहजिकच काळ जसा पुढे सरकतो, विचार चक्र बदलतात, त्या काही कृती करवतात, भावना उमटतात आणि राग + दुःख होत. हे आपण थांबवू नाही शकतं. ह्याचा अर्थ बदल, होणे, जाणे, घडणे हे _मानवी_ शक्तीच्या हातात नाही - ती _दैवी_ क्रिया आहे. दैवी क्रिया जाणवायला हवी आणि त्या प्रमाणे स्वतःचा भाव करायला हवा. 

ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर नाम घेणे सुचवलेले आहे. नाम घेणे हा भाव मनाला धारण करायला आपण सांगतो. तो भाव उदय पावला, की भगवंत - हे सत्य - आपण होतो. आपण पूर्ण अंतर्मुख होतो. थोडक्यात भगवंत, हा शब्द, अक्षर, भाव, क्रिया, कार्य, अस्तित्व, सत्य, अनंत, पलीकडे, अद्वैत आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home