Friday, August 30, 2024

श्री

 श्री 


दृष्याशी संबंध आणि व्यवहार भगवंताच्या इच्छेने निर्माण होत राहतो. त्याची इच्छा आणि कार्य. त्या कार्यात अनेक आकारात वावरणे आणि अनेक स्तरात असणे हे ही येतं, म्हणून आहे तो परिणाम स्वीकारायला लागतो. 

आपण गोष्टी का लपवातो? हा विचार झाला. आणि दुसरे आपल्या वर टपलेले आहेत असे का वाटते? आणि असा का विचार करावा की कुणी मुद्दामून दुखावतो आपल्याला?...

परिस्थिती किंव्हा बाहेरून सुख किंव्हा दुःख कुणी देत नाही. ती संकल्पना आहे आतून आलेली म्हणून दृश्यांची बाधा होते. सुख किंव्हा दुःख समजूत आहे अस्तित्वाची. स्वभाव सत्याचा आपण नीट ओळखला नाही, म्हणून त्रास होतो.

दुसरी गोष्ट म्हणजे निर्मितीमुळे आपण खूप गोष्टींचा हव्यास आणि अट्टाहास धरत राहतो. हे ही चुकीचे आहे. जर निर्मितीचे मालक आपण मुळीच नाही, तर हा हव्यास आणि अट्टाहास कसला?!! आणि असे करून समाधान कसे लाभेल? 

तिसरी गोष्ट म्हणजे काहीही लपत नसते आणि काहीही अडवता येत नाही - सर्वांचा परिणाम होतो. कुठल्याही निर्णयाचा परिणाम होतो...म्हणून स्वच्छ मनाने कार्य करणे. त्याचा ही प्रवास आहे. जे हाती लागेल ते स्वीकारावे, कारण सर्व काही देवाची क्रिया आहे. क्रिया म्हणालो तर विविध प्रकारचे संबंध आले आणि परिणाम ही आला. ते स्वीकारावे आणि दोष न द्यावा. जे आहे ते आहे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home