Friday, August 23, 2024

श्री

 श्री 


भगवंतावर श्रद्धा अनेक प्रकारच्या विचारांमधून होत असावी. 

स्वभाव किंव्हा शक्तीचे रूप किंव्हा त्याचा परिणाम, होणे, वावरणे हे राहणारच. एखादी परिस्थिती, व्यक्ती, दृश्य, क्रिया, वृत्ती, परिणाम, गुंतून राहणे ह्या गोष्टी निर्माण होणार. कुठलीही ह्यातील निर्माण झालेली गोष्ट "स्थिर" असतं नाही आणि हा झाला दृश्यात येण्याचा परिणाम आणि स्वभाव. जे स्थिर नाही, ती ओघाने बदलणार, ती पूर्ण नसणार, ती विचार आणि भावनांच्या पद्धतीने कळणार, ती वृत्तीतून उमटणार आणि वृत्तीमुळे ओळखली जाणार, ती दृश्याचा जाणिवेत असणार. एकंदरीत दृश्याचा स्वभाव झाला (सगुण होण्याचा), ज्यात आपणही होतो (किंव्हा होत राहतो). त्या होण्यास अनेक स्तर, स्थिती, क्रिया कारणीभूत आहेत, ज्यावरून स्वतःचा स्वभाव घडतं राहतो आणि अर्थ निर्माण करत राहतो. म्हणून मन अनेक भावना निर्माण करत राहते, अनेक संकल्पना, अनेक शंका, अनेक तर्कवितर्क, अनेक कृती, अनेक चंचल राहण्याची परिस्थिती...तसे आपले मन वावरत राहते. 

स्वभाव राहतो - तो कुणाच्या सांगण्यावरून होत नाही किंव्हा जुमानत नाही. म्हणजे तो एखादी जाणीव किंव्हा क्रिया म्हणून राहतो - जी मूलतः भगवंताच्या अस्तित्वामुळे निर्माण होत राहते. म्हणजे सर्वांची पायमुळे भगवंत आहे, पलीकडून आलेले आहे, दिले गेले आहे, निमित्त आहे. 

स्वभाव, त्या अर्थाने "सत्य" नाही. म्हणजे तो तात्पुरत्या क्रियेमुळे निर्माण झालेला आहे. ती भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारणे. जे होत आहे, त्याला खूप गूढ क्रिया म्हणून स्वीकारणे आणि आलेले अनुभव शुध्द स्थितीत स्वीकारणे. 

कुरकुर करून काय उपयोग?! देह जाणार आहे. तसेच मन जाणार आहे किंव्हा बदलत राहणार आहे. म्हणजे दृश्यांची स्थिती आणि स्तर बदलत राहणार आहे. बदल हा जर स्थायी भाव आहे सगुण रूपाचा, तर त्यावर टीका का करणे?! जे आपले नाही, त्याला आपले (जीवाचे) मानणे बरोबर ठरेल का?! जर करता आपण नाही ह्या सृष्टीचा, त्याला आपणच कर्तेपण ओढून घेणे बरोबर ठरेल का?! गफलत होत असते समजुती मध्ये, म्हणून सत्य काय आहे हे ओळखणे गरजेचे ठरते.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home