श्री
श्री
स्पष्टीकरण करणे मनात, स्वतःसाठी किंव्हा इतरांसाठी किंव्हा कुठल्याही भाषेत हे अनुभवाचे एक रूप आहे. त्याची गरज असते कारण जिथे जाणीव आहे, तिथे शक्तीचे अस्तीत्व आहे आणि संबंध आहे, वावर आहे, गुंतणे आहे आणि ह्याचा परिणाम म्हणून का होईना, विचार किंव्हा भावना किंव्हा अहं ची निर्मिती/ होणे/ असणे/ वावरणे आहे. स्पष्टीकरण चे बरेच रूप असावेत, ज्याला जे भावेल, पटेल, रुचेल तसे त्याने करावे. एका अर्थी कार्य करत राहणे हेतू न ठेवता - हे ही स्पष्टीकरण झाले.
आणखीन खोल प्रश्न असा आहे की आपण काय साध्य करायचं बघतो स्पष्टीकरण करतांना? मला वाटतं की अनुभव स्पष्टीकरण करायला असू नये किंव्हा येऊ नये किंव्हा त्याचा वापर करू नये किंव्हा भांडवल करू नये. अनुभव ही दैवी क्रिया आहे ज्यात सुक्षमापासून ते स्थुलापर्यंत गोष्टी संबंधित असतात. त्यामुळे द्वैतची रचना होऊन अनंत अर्थ निर्माण होतात. निर्मितीला हेतू नाही, जसे अस्तित्वाला नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. किंव्हा भगवंत निर्गुण आणि सगुण दोन्ही रुपात वावरतो.
तिसरा प्रश्न आहे तो "मंत्र" शब्दाचा. जीव हा भाव आहे, तसा तो मंत्रही आहे. मंत्र म्हणजे जिथे सतत त्या वस्तूवर आपण अनुसंधान करतो. सध्या आपला मंत्र तात्पुरतेपण, अहं, भीती, दृश्य असा आहे - म्हणून तेच प्रचीतीला येतं. भगवंताची शक्ती किंव्हा नाम हे ही मंत्र असू शकत, जिथे लक्ष केंद्रित केलं तर आपले मन तसे होईल! म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने "मंत्र" हे साधन आहे ज्याच्यावर अनुसंधान टिकून मन स्थिर होत आणि त्या शक्तीचे रूप स्वतःच मन घेतं.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home