Friday, October 03, 2025

श्री

 श्री 


शांत होणे आणि मनाची वळवळ विलीन होणे, हा अनुभव असतो. ते होण्यासाठी अभ्यास लागतो, प्रयत्न लागतात, श्रद्धा लागते आणि भगवंताची कृपा लागते. आपण इथे कशासाठी जन्म घेतला आहे, हे मनाने पक्के करायला हवे...म्हणजेच की आपल्या मूळ स्वभावाच्या शोधाला लागणे आणि त्यात स्थिर होणे. शक्तीचे स्वतः _जागे होणे_ असे ह्याला म्हणतात.  

मूळ शुद्ध शक्ती भगवंताची आहे, तो भगवंतच आहे, ती शांतीच आहे. त्यातून हे सारे कार्य, विश्व भाव, संबंध, रूप आणि आकार येतात आणि विलीन होतात. जे दिसते इंद्रियांना, ती अस्तित्व शक्तीची स्थूल स्थिती आहे. त्याच्याही पलीकडे ६ सूक्ष्म स्तर आहेत, असा हरिपाठ मध्ये उल्लेख आहे. 

ते स्तर होणे किंव्हा जाणून घेता येणे, हा आपला प्रवास आहे. कार्य किंवा हालचाली किंव्हा गती किंव्हा बदल किंव्हा परिणाम हे सूक्ष्म माध्यमामुळे होत राहते. त्याचा गुण धर्मच म्हणा की एकातून अनेकपणा निर्माण होत राहणे आणि त्यांच्यातील संबंध जोडत राहणे. 

त्या कार्याची ओळख होणे, हे आपल्या जीवनाचे सार आहे. ओळख स्वतःचीच करणे आहे. स्वतः सिद्ध.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home