Shree
Shree
Not knowing the end of the loop is a divine blessing for me, because I can then trust the ending of the loop. If I had known it, I might have used it to ensure my own intellect's survival - which would have been terrible, as an experience in every moment. Therefore there is actually no need to worry about the end of the loop or how the loop turns out to be.
This also means that the creation of the loop and how it behaves and ends is a divine action, not mine. I need to trust that 100 percent.
Secondly, I only have the certainty of _action_ in my hands and not its fruits or results. Action is required to be done every instant, every time, every place. None is left from it. Therefore that is the only _Path_ I have.
Thirdly I can take _any_ form that I decide. Decision is important.
Fourth, there is no urgency that can't be responded calmly. There is no such thing as the ultimate disaster, not even death. काहीही झाले, तरीही आभाळ कोसळत नाही.
Hari Om.
श्री
भगवंताचा भाव आत्मसात होण्यासाठी सर्व दृश्यातील स्वभाव विसरायला हवेत किंव्हा ते शांतीत _परिवर्तित_ व्हायला हवे. म्हणजे शांतीत स्थिरावलो तर इतर वृत्तीशी संबंध राहणार नाही/ तो ठेवण्याची जरुरी वाटणार नाही/ त्याचा प्रभाव होणार नाही/ त्याच्याशी संबंध शांतीचे होतील. थोडक्यात _व्ययक्तिक स्मरण विलीन_ होईल. हाच आध्यात्मिक मार्ग म्हणून ओळखावा.
जाणीव नेणीव भगवंती नाही I
उच्चारणी पाही मोक्ष सदा II
संबंध/ वावर/ कार्य/ स्मरण शुद्ध होणे ह्यास संबोधले आहे. शांती, समाधान, शुद्धता - हे सर्वांगीण सत्य ध्यानी यावे लागते - ते सगुणात नाही, मर्यादित नाही, स्वभावाशी निगडित नाही, परिस्थितीशी संबंधित नाही, स्मरणेशी त्याचा संबंध नाही.
तरीही इथे "नाही" हा अर्थ गूढ आहे, बौद्धिक नाही. फक्त बौद्धिक अर्थ घेतला तर आपण कशाचाही स्वीकार करत नाही - पण हे शक्य नाही आणि कार्य तर घडणारच आणि प्रवास तो होणारच. म्हणून सर्वांच्या पलीकडे होणे (transcendence) ह्या अर्थाने वरील "नाही" असा अर्थ ओळखावा. मार्ग दृश्यात आहे, ह्यात दुमत नाही. त्यात वावरत राहताना _तरीही_ शांती भाव गवसते, अशी श्रद्धा वाढवायची आहे. त्यासाठी अमाप अनुभवातून जावे लागेल आणि ते गरजेचे असावे कारण ते भगवंताने दिलेले असते.
शांती सत्य आहे, दृश्य नाही.
हरि ओम
श्री
आभाळ कोसळत नाही कशानेही. स्थळ, काळ, क्रिया, सगुण, प्रवाह, अनुभव - ह्यांच्या हालचाली, संबंध असतात आणि त्यात मन _गुंतून_ राहते.
आपण ह्यात कार्य करणे फक्त भाग असते आणि जे काही करू ते भगवंताला अनुसरून करावे. म्हणजे मूळ हेतू किंव्हा शक्ती शुद्ध अस्तित्वाची असते आणि कार्याची ओळख - ह्या पार्श्वभूमीतून स्वतःचे कार्य करावे.
आपण कुणाकडूनही ठरत नसतो किंव्हा लेखण्याची गरज नसते स्वतःला. पूर्वी जाणिवेत येऊ गेलेल्या गोष्टी आणि त्यावरून उद्याचे संबंध - ह्याने आपण ठरू नये - म्हणजे ही बुद्धीने विषय (गुंता) सोडवू नये. अपरिहार्य अस्तित्वात असल्यामुळे चुका झाल्या असतील आणि परिणाम झाल्या असतील, तरीही त्यामुळे "वेळ वाया गेला" किंव्हा "चूक झाली" ह्या अर्थाने स्वतःला दोष देऊ नये - ते गरजेचे नसते.
जे काही होते, ते भगवंताच्या इच्छेमुळे घडते, म्हणून सूक्ष्म माध्यम सत्य असते आणि त्यातून सर्व प्रकाराचे अनुभव ध्यानी येत राहतात. हा अभ्यास असतो स्थिर होण्याचा आणि तो गूढ असावा, योग्य काळ लागावा. कृपेमुळे हे साध्य होतेच, आपण शांतीने चिंतन करत राहावे आणि कार्य करावे. कुणी काहीही करू शकणार नाही.
माझे मन, माझे विचार, माझे संबंध, माझा निश्चय, माझे असणेपण. शांत रहावे.
हरि ओम.
श्री
दृश्यात किंव्हा द्वैताचा अनुभव ध्यानी येत असताना आणि त्याचा परिणाम किंव्हा संस्कार होत राहताना - त्याच्यातच भगवंताच्या कार्याची जाणीव प्रगल्भ करत रहावी. _परिवर्तन_ दृश्यात असताना होत राहते किंबहुना परिवर्तनाला दृश्य आणि मार्ग, अश्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला ध्यानी यायला हवेत. त्यातल्यात्यात दृश्य आपोआप येते, पण मार्ग निश्चयाने पदार्पण करावा लागतो.
त्याच्या पलीकडे ओळखायचे झाले, तर ह्या दोन्ही क्रिया भगवत कृपेने साकार होतात. आलेले अनुभव असे का असतात, त्यातून प्रवास असा का घडतो, त्यातून प्रश्न आणि शोध असे का येत राहतात, त्यातून सैय्यम आणि श्रद्धा कशी प्रस्थापित करावी लागते - हे भगवत कृपेने प्रस्थापित होते.
अर्थातच कृपेचा प्रभाव किंव्हा कार्य सामान्य मनोरचनेत ओळखता येणे कठीण. त्यासाठीच म्हणून मार्ग पत्करावा लागतो, ज्यावरून कृपेची जाणीव अधिकाधिक प्रखर होत जाते.
बऱ्याच गोष्टी - ओळखणे, समजून घेणे, ऐकणे, कार्य करणे - ह्याला आध्यात्मिक रंगाने आत्मसात करावे लागते. शब्द आणि त्यातील मतितार्थ आध्यात्मिक असावा ग्रंथातून मांडलेला. त्या भावनेने ते समजून घ्यावे.
हरि ओम.
श्री
श्रद्धा ठेवणे संबंधात, कार्यात, हालचालीत हे खूप महत्त्वाचे ठरते. चिकित्सेला काही अंत नाही. अंत होणे, हा समाधानाचा गुण आहे, आणि तो सर्व अर्पण करून येतो.
एका मर्यादे पर्यंत विचार करावा, आणि स्वच्छ मनाने निर्णय घेऊन भगवंताच्या कार्यावर सोपवावे. असे संस्कार मनाला द्यावे लागतात.
ह्याच्या पुढे जायचे झाले, तर मन, बुद्धी, भावना - हे देखील भगवंत कार्याचेच प्रतीक आहेत, हा भाव प्रस्थापित होऊ द्यावा म्हणजे सर्वांगीण शांती संक्रांत होते.
हरि ओम.
श्री
अनुभवाचे प्रयोजन भगवंत करतो. म्हणजे तो देतो अनुभव, ज्याच्यातून जीवाला त्याच्या पर्यंत पोहोचायचे असते. स्मरण कायम असते कुठल्या ना कुठल्यातरी शक्तीच्या रूपात. ते स्मरण भगवंताशी _संबंधित_ असते. ते कसे, तर तो गूढ प्रकार असतो असा ओळखावा, आणि त्यासाठीच नामस्मरण करणे येते.
तो गूढ संबंध विचाराचे किंव्हा संबंधांचे परिवर्तन होऊन आकलनात येतो. त्यासाठी श्रद्धा वाढवावी. आणि त्या प्रवासात समाधानी रहाणे अत्यंत गरजेचे ठरते.
जन्म, अनुभव, प्रवास, रूप,आकार, निश्चय, परिणाम - ह्यातून समाधान भाव प्रस्थापित करायचा असतो. प्रत्येक विचार ज्याच्या त्याच्या पद्धतीने संक्रांत होतो आणि वावरत राहतो. त्याला घाई करणे किंवा कुणाचे मन वळवणे गरजेचे नसते. आपण प्रयत्नात रहावे, आणि सतत कार्यात रहावे. तेवढेच.
हरि ओम.
श्री
स्वतःच्या आत शुद्ध भाव कायम असतो, स्थिर असतो, सूक्ष्म असतो, समाधानी असतो, शांत असतो - असा प्रत्यक्ष अनुभव जाणिवेत आणायचा असतो. त्यासाठी अभ्यास, प्रयत्न, सैय्यम, श्रद्धा, आपुलकी ह्या सर्व गोष्टी आत्मसात होऊ द्यावा लागतात.
वरील भावांचा शोध किंव्हा जाणीव प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पद्धतीने घ्यावी लागते. कुणाला वरील भावना कश्या गवसतील, हे इतरांनी ठरवण्याची गरज नसते आणि ते शक्य नसते.
कलेतून, वास्तुशास्त्रातून, कुठल्याही कामातून, नात्यातून, व्यवहारातून, वरील भावना मनात प्रकट होऊ द्यायचे असतात आणि ते स्थिरावायचे असतात. सर्व इतर भावना वरील शुद्ध भावनेत _परिवर्तित_ (किंव्हा विलीन) होऊ द्यावे लागतात.
ह्यालाच दुसऱ्या भाषेत _शुद्ध अस्तित्व भाव_, असे संबोधले आहे.
हरि ओम.
श्री
हालचालींचे स्थान आणि सर्व अस्तित्वातील परिणाम, हे भगवंत भावनेतून प्रकट होते. म्हणजे तोच भाव सत्य मानावा अस्तित्वात किंबहुना शुद्ध अस्तित्व म्हणजेच तो भाव.
भीती कुणाचीही नसते पण ती एका गूढ कार्यातून आलेली असते. ते कार्य जर आत्मसात होऊ दिले, तर भीती विरघळून जाते. दररोजच्या व्यवहारात, आपण प्रत्येक जीवाला संपूर्ण स्वीकारावे शांतीने. ते तेव्हाच शक्य होते, जेव्हा आपण स्वतःला संपूर्ण स्वीकारतो.
भीती, काळजी, कष्ट, चिंता काही न्यूनगंडाचे लक्षण नाही किंव्हा त्यातून स्वतःला लेखण्याचीही गरज नाही. ह्या भावनेचा मूळ असा ओळखावा की भगवंतावर श्रद्धा अजून भक्कम होऊ द्यायची आहे. वरील क्लिष्ट भावना का येत राहतात, ह्याचे उत्तर मला - किंव्हा बुद्धीला, भावनेला _माहित नाही_, ते त्या मर्यादेच्या पलीकडे असावे. तरीही ते गवसणे अशक्य नाही. भगवंताचे चिंतन करत गेले, की ते गवसेल, असे सुचित आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home