श्री
श्री
आतील क्रिया बऱ्याच स्तरात होत असते - शक्तीची. स्थूल स्तरात शक्तीला आपला भाव किंव्हा स्मरण म्हणून ओळखला जातो, म्हणून शक्तीचे स्मरण स्पष्ट होणे अवघड होते.
शक्तीचे कार्य हे, की एकातून अनेक रूप आणि आकारांचे हालचाली किंव्हा संबंध प्रस्थापित होतात/ निर्माण होतात आणि ह्याला भगवंताची इच्छा किंव्हा त्याचे कार्य असे संबोधले जाते.
त्या सत्यात विलीन होण्याचा आटोकाट प्रयत्न करायला लागतो, सैय्यम ठेवायला लागतो आणि श्रद्धा वाढवत राहायला लागते. म्हणजे सत्याचा भाव ध्यानात यायला हवा, जरीही आपण दृश्यात वावरत राहिलो तरीही. किंव्हा त्याचा अर्थ की रूप आणि आकारांचे कार्य सुरू राहून देखील ध्यानी सत्य भावनेत मन राहू शकते.
दृश्यात गुंतायला कुठलेही छोटेसे निमित्त पुरे ठरते, म्हणून कसे _परिणाम_ असतात दृश्यात, ह्याचा मागोवा देखील पूर्ण ध्यानात येणे कठीण. In other words although there might be an _existence_ of forms (movements, changes, connections), one can yet become a truthful subtle blissful existence.
Therefore the question is fundamentally, what do you call as Existence?!! The answer to that is - _choice of being and becoming_.
*निर्णय* हे गूढ प्रकरण त्या अर्थाने ओळखावे, की त्यातून परिवर्तन होऊन सूक्ष्मात पदार्पण होऊ शकते.
म्हणून शुद्ध अस्तित्व असतेच आणि अनेक स्तरही असतात एकाच वेळेला. निर्णय घ्यावा की कुठल्या स्तरात आपण वावरायचे आहे?! Ask and you shall get.
परिणाम, हे अस्तित्वाच्या कार्यातून प्रस्थापित होते. म्हणजे अंतःकरण शुद्ध होण्यास त्यासाठी महत्व असते, की परिणाम योग्य होते आणि मन स्थिरावते.
हरि ओम.
श्री
हेतू शुद्ध किंव्हा भगवंतमय होऊ द्यावा. दुसरे आयुष्यात सत्य नाही. शक्ती, हेतू, कार्य, परिणाम - हे एकच असते, हे जाणून घ्यावे.
Thinking, dwelling, communicating, acting, perceiving, memory, space, time, situation - come under one lens. Depending on how a thought occurs and how a relationship gets formed, all other things get affected and perceived. Therefore the reality is not any space or time, but a _vibration of Existence_.
Engagement with anything external form creates consequences in inner states. Therefore, virtual tools also create an effect on the inner world of thoughts.
The current problem can be understood as this - for long the thoughts were engaged with real space - time behaviour, some of the thoughts could have been transcendental as well (only for a few people). And that was how everything else (even the tools or technology) was engaged with.
Now the situation seems reversed or replaced by intensely engaging with virtual tools - to the extent that it has modified the behaviour of thinking patterns and whatever virtual experience creates, is becoming the new reality (which also displaces the reality of real space - time engagement).
This brings a fundamental query for human beings - what is reality then? What creates it, who creates it and how is it sustained?
What purpose should reality present itself? What is purpose? Should purpose be required to live?....
Hari Om.
श्री
आयुष्याची गती किंव्हा बदल कितीही प्रमाणात वाटत गेली, तरीही मी शांत राहणार. मला हे शिकायचे आहे, की गतीवरून मी स्वतःला लेखण्याची गरज नाही. परिस्थितीचे उगम भगवंताचे कार्य असते आणि त्यातून माझा जन्म झाला असतो आणि वावरणे प्रस्थापित होते आणि एक दिवस मी विलीन होतो. इथे "मी" निमित्त आहे कार्य होत राहण्यासाठी. त्या कार्यातून भाव, स्मरण, बुद्धी, भावना, देह, दृश्य, संबंध अश्या गोष्टी येत राहतात आणि त्यातून हालचालींचे स्वरूप तैय्यार होत राहते.
हे होणार. ते स्वीकारावे आणि व्याकुळ न व्हावे. हे व्ययक्तिक नसते. अनुभव सर्वांना येतो आणि प्रवास सर्वांचा असतो, जो संबंधातून हाथी घ्यावा लागतो. प्रवास आहे भगवंतमय होण्याचा आणि त्याचा मार्ग दृश्यातून असतो. त्यासाठी नामस्मरण करावे.
हरि ओम.
श्री
बऱ्याच प्रकारे नामाच्या परिणामांबद्दल बोलता येऊ शकतं -
मी, मग तो भाव कसाही आलेला असो, तो मंदावत जाणे. म्हणजे थोडक्यात सर्व गोष्टीतून ज्यामुळे "मी" हे संबंध प्रस्थापित होतात, ते शिथिल होणे/ त्याचे मुल्य नाहीसे होणे/ त्यांच्यात न गुंतणे, वगैरे. त्यासाठी आणखीन सूक्ष्म, शांत, स्थिर मूल्याला मनाच्या शक्तीने धरावे लागते, किंव्हा त्यात पूर्णपणे विलीन व्हावे लागते/ परिवर्तित व्हावे लागते. त्या मूल्याची आठवण करून देण्यासाठी नामाचा पाठ करत रहावा.
मन, जास्तकरून, बहिर्मुख असते आणि संबंधात वावरत असते, विघटित असते, शक्ती खर्च करत राहते, चक्रात असते, वगैरे. बहिर्मुख म्हणजे बुद्धी आणि भावनेचा स्वभाव जो परावलंबी आणि जर - तर या भाषेत वावरत असतो. मन कालांतराने अंतर्मुख होते नाम घेत गेल्याने, आणि सूक्ष्म कार्य अनुभवते, सूक्ष्माचे संस्कार त्याच्या ध्यानात येते आणि ते पूर्ण विलीन होते.
भगवंताचे कार्य होत असते, मी, हा भाव असो किंवा नसो. त्या कार्याची ओळख होण्यासाठी नाम घ्यावे. आर्ततेने नाम घेत गेलो, तर शांती भाव प्रकट होते. ह्याचा असाही अर्थ होतो की शक्तीचे वावर गूढ असते आणि त्यात बऱ्याच गोष्टी सामील असतात, ज्याला आपण स्तर, वासना, विचार, भावना, देह, संबंध, परिणाम - अश्या गोष्टीतून शक्तीचे वर्णन करतो. वर्णन केले, तरी ती शक्ती भगवंताचीच असते, त्यावर आपण काहीही हक्क सिद्ध होण्याचा प्रयत्न करू शकत नाही. म्हणून सर्व भगवंताला अर्पण करावे. जे होईल, ते शांतीने स्वीकारावे.
अंतर्मुख स्तर असे असते, की त्यातील कार्यामुळे, शांत व्हायला होते आणि _बोलण्याची गरज निघून जाते_. बोलण्यातून बऱ्याच गोष्टी होतात - सिद्ध होण्याचा अट्टाहास, अपेक्षा, गुंतत राहणे, सुख आणि दुःखाची बाधा, विषय सोडवत राहण्याचा अट्टाहास किंव्हा धडपड, भीती, विषयाला धरत राहणे, व्यवहारात दंग राहणे, वगैरे. हे सर्व शिथिल होत जाते, म्हणून शांतीचा अनुभव येतो. त्यात एकदा आपण मिसळलो, की तिथेच रममाण होतो.
श्रद्धा वाढवणे, म्हणजेच मार्गात जात राहणे. हा मार्ग गूढ आणि सर्वांगीण ठरतो, कारण सर्व स्तर ह्यांच्यात योग्य परिवर्तन घडवून आणायचे असते. त्यासाठी प्रयत्न, सैय्यम, आपुलकी, प्रार्थना, कृपा - ह्यांची गरज लागते. नामस्मरण करत राहणे.
आपण कसे अर्थ लावतो, ह्यावर शांतीने बघावे न व्याकुळ होता. तिथे मनाचा निग्रह लागेल, पण त्याने योग्य परिवर्तन होत जाईल.
भगवंतासाठी सर्व अनुभव असावे, ही भावना स्थिर व्हायला सातत्य लागते. त्या प्रवासात गोष्टी येत राहतात. त्याकडे बघावे आणि शांत रहावे.
हरि ओम.
श्री
विचारांमधून खूप स्थळातील पसरणारे आणि काळातील पसरणारे संबंध होऊ पाहतात. हे अस्तित्वाचे कार्य ओळखावे.
कार्याचा परिणाम गूढ पद्धतीने व्ययक्तिक स्मरण मध्ये होते, म्हणजे त्यात "मी" हा भाव होतो आणि त्यात वावरतो, संबंधांचे स्वरूप निर्माण करतो आणि त्यामुळे दृश्याशी व्यवहार करतो.
सर्वांचे बीज विचारात दडलेले असते, हे जाणून घ्यावे. म्हणजे विचार होण्याचा _प्रभाव_ काय करून घ्यावा, हा निर्णय महत्वाचा आहे स्वतःसाठी. तो प्रभाव योग्य होणे, म्हणजे सत्यात विलीन होणे, किंव्हा सत्य भाव होणे, असा आहे.
माझ्या मते ह्यालाही दोन अंगे आहेत. एक अंग म्हणजे सत्य शिवाय ध्यानात काहीही न येणे...विचारही नाही. त्यातील दुसरा भाग असा की विचार जरी आले ध्यानात, तरी संबंध शांतीचे असल्यामुळे, विचारात वावरणे दृश्याच्या स्वरूपात होत नाही. म्हणजे आपण कायम शांतच राहतो, परिस्थिती किंव्हा अनुभव ध्यानात कसेही रूप घेत गेले तरीही.
म्हणून असे म्हणतात, की दृश्यात असताना, आपण मार्ग पत्करावा आणि शांत होत रहावे.
हरि ओम.
श्री
अस्तित्वात भीती ही असते, पण त्यातून पळणे, सिद्ध होणे, विषय वाढवणे, स्वार्थी होणे, कष्टी होणे, घालून पाडून बोलणे असा त्याचा तोडगा बिलकुल नाही. भीती नेमकी का येते, हे ओळखणे महत्वाचे असते आणि त्याचे बीज विचारांच्या रूपात ज्या पद्धतीने संबंध प्रस्थापित होतात, त्या पद्धतीने _भीतीचे रूप निर्माण होते_. म्हणजे भीती गूढ आहे, तिला वरवर हाकलून पळवणे नामुंकीन जाते.
आता ह्यावरून प्रश्न असा येतो की भीती शांत कशी होऊ द्यावी?
त्यावर पर्याय आहे _मार्गावर जात राहणे._ हे ही खूप सैय्यम ठेवून, श्रद्धा बाळगून करावे. म्हणजे भीती जाण्याचे प्रयोजन भगवंताच्या कृपेवर आहे, हे जाणून घ्यावे.
हरि ओम.
श्री
भगवंता बद्दल बऱ्याच प्रकारे गोष्टी म्हणू शकतो -
अंतर जेवढे जास्त भगवंत भावनेतून, तेवढ्या स्थूल स्तरात वावरणे असते स्वतःचे आणि सिद्ध करण्याचा तसा विषय निर्माण करत राहतो आपण. थोडक्यात, सिद्ध करण्याच्या धडपडीत राहणे म्हणजे सत्यातून अंतर असणे, म्हणून सर्व विघटित आणि प्रवाहात आणि तात्पुरते असण्याचे वाटत राहते.
विचारांच्या पाठीमागे संबंधांचे स्पंदने असतात. ते शांत करायला लागतात किंव्हा स्पंदनांच्या जाणिवेत भगवंत भाव शिरायला लागतो. आपण स्वतःला कोण समजून घेतो, त्यावरून स्पंदनांचे रूप किंव्हा स्वभाव किंवा कार्य ठरत असते. त्या अर्थाने, सध्या आपण "दगड" आहोत!
हालचालींना मुल्य वासना, विचार, भावना, देह - अश्या बरेच घटक देत राहतात. टप्प्या टप्प्यातून एक एक घटक शांत व्हायला लागतो जेणेकरून सूक्ष्म कार्यात स्वतःचे प्रवेश होते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट आत्ताच्या क्षणी ही आहे, की त्वरित शांत व्हा आणि त्यावरून मोकळीकपणा अनुभवा! मागे काय, पुढे काय, वगैरे सर्व गोष्टी अक्षरशः नगण्य आहेत त्या सत्य शांतीच्या समोर किंव्हा ह्या कल्पना अस्तित्वातच राहणार नाहीत!
निवांतपणा किंव्हा स्वस्थता आत जाऊ द्यावी. ती कुठल्याही परिस्थितीवर अवलंबून ठरवू नये. म्हणजे सर्व नात्यात, बदलात, देहात, रूपात, काळात, स्थळात निवांतपणा येऊ द्यावा. विचारातही निवांतपणा संक्रांत होऊ द्यावा. अजून काहीही महत्वाचे नसते.
हरि ओम.
Shree
The house is a machine to live in...is some quote doing the rounds of architectural fraternity.
It has continued to go to the level of life is a machine to live in! Obnoxious, but true.
Machines don't transform or outgrown themselves, and that's what differentiates us from the machine - like thinking.
But who knows, this idea might be endangered! Unless it comes to the sole point of an individual decision of continuing to being a human versus the collective idea of being a machine!
That's what is at stake here.
Of course, the dilemma isn't new and it's extremely dated as far as philosophy is concerned. The machine - like behaviour (माया आणि सिद्ध होणे) comes from "fear", or ignorance of Truth, as the reality of transforming the mind. If the mind is allowed to go its way of solving "problems", what it ends up is more analysis, more production, more multi tasking,more fragmentation, more algorithms, more machine - like thinking. The fear, doesn't go however!
Therefore the way is to surrender and let oneself transform. This has been acknowledged as the only Path to eternal bliss.
This requires constant reminding to us.
Hari Om.
श्री
सर्व _घडामोडींची_ जाणीव शांत होऊ द्यावी. शांत, हा भाव आहे, आणि भाव एका विशिष्ठ स्तरात असतो. ह्याचा असाही अर्थ होतो की बुद्धी आणि भावना आणि संबंधांचे रूप स्तर प्रमाणे प्रस्थापित होत असतात.
सर्व मनाच्या शक्तीवर आहे. एका _परिस्थितीत_ जन्म घेतला की तीच पुढे राहील असे नाही. किंबहुना शांती भावना कुठल्याही असलेल्या परिस्थितीशी निगडीत असू नये/ करू नये. किंव्हा परिस्थितीचा स्वभाव आणि उगम कसा प्रस्थापित होतो, हे जाणून घ्यावे आणि स्वीकारून शांत होत राहण्याचा/ सत्य आत्मसात होण्याचा प्रयत्न करत राहावे.
हरि ओम.
श्री
बुद्धीने सर्व व्यवहार होत असतील, पण समाधान त्यातून मिळते का, हे पारखावे. म्हणजे समाधानी "होणे" हे कुठल्याही शक्तीच्या रूपाच्या सिद्ध होण्यात असते का? रूप आणि आकार आहे, म्हणजे तिथे हालचाली आणि संबंध आले, म्हणजे बदल आला, म्हणजे तात्पुरतेपण आले, म्हणजे अस्थिर भाव आला.
आपल्याला विचार रूपातून न करता, त्याच्या पलीकडील सूक्ष्म स्तरात करायचा आहे, जेणेकरून स्वतः मध्ये योग्य परिवर्तन होत राहते आणि समाधान गवसते. तसा विचार होणे म्हणजे *श्रद्धा*. श्रद्धा मनाची एक शक्ती आहे, ज्यामुळे इतर सर्व विचारांचे शांतीत रूपांतर होऊ शकते.
जर अस्तित्व शक्ती जिवंत आहे, तर त्यातून होणारे सर्व घटक जिवंत असणार आणि त्याचा स्वभाव किंव्हा गुण असणार. ह्यातून हे दिसून येते की गुणातीत भगवंत शक्ती पर्यंत आपण पोहोचू शकतो.
हरि ओम.
श्री
अस्तित्वात निर्माण क्षमता हे कार्य, गूढ आहे, म्हणून त्यातून रूप आणि आकार हे होत राहतात आणि म्हणून मनाची शक्ती, हा अनुभव, _प्रकट_ होतो.
म्हणून बुद्धीमुळे, जरी परिस्थितीत विविधपणा दिसून आला, तरी त्याने घाबरू नये, कारण हा सर्व मनाचा स्वभाव असतो, जो परिस्थितीत गुंतून राहतो, त्याला निर्माण करत राहतो.
प्रकार निर्मिती स्वभावाचा आहे, ज्यातून शांतीत परिवर्तन होऊन अस्थिर किंव्हा तात्पुरता अनुभव निर्माण होतो आणि संबंध प्रस्थापित करतो आणि त्यातून सर्व हेवेदावे येत राहतात.
वरील प्रकार सोडवण्याची गरज असते का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण त्या प्रश्नाला शांत होऊ द्यावे लागते - म्हणजेच सत्याचे स्मरण होणे. ते होण्यासाठी मार्ग असतात आणि त्यावरून जात रहावे.
I don't think it is possible to rectify anything or any problem. The problem is how the mind chooses to _think_ and create a reality which appears fragmented. _Realise_ the situation, one needn't try to understand it. I.e. it is very much possible to remain calm despite the tendency of the mind and what it keeps creating because of that tendency. This also means to surrender one's identification with any limited thought.
हरि ओम.
श्री
स्वतःच्या रूपाचे रहस्य किंव्हा उगम गूढ असते, म्हणून ते कुठून येते, कसे येते, का येते, काय संबंध निर्माण करते, हे सर्व _प्रश्न_ श्रद्धेने शांत करावे लागतात (स्वीकार आणि येऊ देणे) आणि भगवंताच्या इच्छेवर श्रद्धा ठेवावी लागते. हा नियम नाही किंव्हा जबाबदारी नाही - फक्त जाणीव आहे. जाणीव शुद्ध किंव्हा सूक्ष्म होण्याचा त्याचा त्याचा प्रवास असतो...तो प्रवास भगवंताच्या कृपेने होतो - तो प्रवास होऊ द्यावा, कारण त्याचे प्रयोजन केले गेले आहे.
शांत असण्याचा खरा अर्थ हा - की सर्व होण्याला स्वीकार करावा आणि त्यातून भगवंताच्या कार्यावर श्रद्धा प्रस्थापित होऊ द्यावी.
हरि ओम.
श्री
विचारातून बऱ्याच प्रकाराच्या हालचाली आपल्या स्तरात होतात, आणि त्याचे संस्कारही मनात उमटतात. असा हा सर्व खेळ आहे हालचालींचा...की त्यात स्मरण, भाव, साखळी, हेतू, क्रिया, परिणाम, चक्र - ह्या साऱ्या गोष्टी अनुभवात येत राहतात प्रत्येक स्तरात. आपल्यासाठी निर्णय असा आहे - की त्यामुळे आपण ह्याच स्तरात रममाण राहायचे की परिवर्तन होत सूक्ष्माकडे प्रवास पत्करावा? निर्णयासाठीही प्रवास होतो, अनंत प्रश्न आणि अनुभव पचवावे लागू शकतात, त्यातून हा प्रवास _घडतो_ भगवंताच्या कृपेने. त्याला प्रवास म्हणून ओळखायला श्रद्धेची जरुरी असते स्वतःच्या अस्तित्वात.
प्रवास आणि अनुभव ते असणार...कितीही आपण सूक्ष्माचे कार्य ओळखले तरीही. म्हणजे सूक्ष्मात परिवर्तन होणे, हे कार्य सुद्धा सहज होणे अभिप्रेत आहे - कष्ट घेऊन नाही. सहज म्हणजे श्रद्धेने.
आपण इथे का आलो, ह्याला तसे बुद्धीतून कारण नाही, म्हणून त्याला भगवंताची इच्छा किंव्हा श्रद्धा असे ओळखावे. त्याच पद्धतीने सूक्ष्म होणे हा श्रद्धेचाच भाग आहे, फक्त बुद्धीचा नाही.
हरि ओम.
श्री
विघटित विचार मावळण्याची पद्धत विचारातून साध्य होते का? ह्याचे उत्तर मला ठाऊक नाही खात्रीने. कदाचित विचारानं बरोबर शरणागती लागते, ह्याचा अर्थ की विचारांची मर्यादा स्वीकारून नामस्मरण करत राहणे, असे जास्त योग्य ठरावे.
अनंत विविध वस्तूंची बेरीज करून किंव्हा वजा करून किंव्हा कृती करून किंव्हा हेतू बाळगून पूर्णता येते का, हे ओळखावे. म्हणजे बुद्धीच्या मार्गाने गोळा बेरीज जरी करायची म्हणली, तरीही त्यातून समाधान आत्मसात होईल का, हे बघावे. म्हणजे कितीही मागे गेले किंव्हा पुढे बघितले, तरीही चिंता काही सुटत नाही, कारण मुळातच बुद्धीचा स्वभाव अस्थिर राहतो.
ह्याचा अर्थ की विघटित परिस्थितीतून शांती संपादन करणे, हे बघावे. कुठलीही परिस्थिती ती पूर्णतःच्या अनुभवा पर्यंत शांती भाव देऊ शकते. तो झाला योग्य मार्ग. कोडी किंव्हा विषय सोडवण्या पेक्षा आपण शांतीचे स्पंदने मनात रुजू देणे.
त्याचा एक मार्ग म्हणजे नामात सतत रहावे.
हरि ओम.
श्री
आपण अस्तित्वात कोण आहोत, ही जाणून घेण्याची क्रिया ओळखावी, की त्यातून सत्य ध्यानी येते. आणि सर्व घडामोडी आणि संबंध प्रस्थापित होण्याचे निर्णय - त्या अनुश्रृंगाने होतात.
ममत्व का असते ध्यानी, हे संबंधांचे रूप गूढ आहे. त्याला स्वीकारावे शांतीने. आपण सर्व निस्वार्थीपणे देणे लागतो आणि तसे आत्मसात होऊ द्यावे.
बुद्धीच्या मार्गातून विषय सुटतात का, समाधान प्राप्त होते का आणि सत्य आत्मसात होते का आणि शांती लाभते का, हे ओळखावे. किंव्हा कुठल्या हेतूने अर्थात संबंधातून बुद्धीचे कार्य सुरू ठेवले की शांती भाव गवसेल, हे बघावे. म्हणजे प्रत्येक घटकाच्या वापर किंव्हा हेतू हा शांत होण्यासाठी असावा. सर्व घटक किंव्हा अस्तित्वातील गोष्टी शांत होण्यासाठीच निर्माण झालेले असतात, हे ओळखावे.
आपले इथे येण्याचे प्रयोजन भगवंत जाणून घेण्यासाठीच असते.
हरि ओम.
श्री
संबंध अस्तित्वात येतात आणि त्यातून इतर काही अर्थ आणि गुंतणे होते, हे आतून मान्य होऊ द्यावे - तो काही सांगण्याचा थोडीच विषय असतो??!!
विषयाचा अर्थ असा की आपण अट्टाहास धरतो की आपण तो विषय सोडवू शकू, ताबा असेल आपले, किंव्हा पूर्णतःकडे जाणण्याची इच्छा, वगैरे.
वरील मतितार्थ ध्यानी असावा काहीही करण्यात, सांगण्यात, बघण्यात, ऐकण्यात, व्यवहार करण्यात...त्यावरून शांत होण्याचा मार्ग पत्करला जातो.
शांत होण्याचीही क्रिया हाथी घ्यावी लागते आणि हे कार्य यशस्वी पद्धतीने भगवंताच्या कृपेने साकार होते.
अनुभवांचे प्रयोजन भगवंत देतो, म्हणून सर्व स्थळातील, काळातील, स्थितीतील, संबंधातील, स्मरणातील अनुभव संपूर्ण स्वीकारावे शुद्ध हेतू ठेवून. अनुभव त्रास द्यायला नसतात - ते शांत होऊ द्यायला पाठवलेले असतात.
हरि ओम.
श्री
अस्तित्वात, _सत्य होणे_, हेच मनुष्याचे ध्येय असते, हे ओळखावे. तो ध्येय, प्रवास घेऊन येते, त्याला भगवंताची कृपा लागते, श्रद्धा लागते, प्रयत्न, सैय्यम,आपुलकी, शांती - अश्या गोष्टी लागतात. प्रवास आणि त्यातील अनुभव अशासाठी असतात, की त्यातून अंतर्मुख भाव स्थिरावेल आणि शांतीत सर्वांचे रूपांतर होईल.
घडामोडी त्याच्या इच्छेवर चालतात, तर घडामोडींचाही अर्थ आणि कार्य गूढ असते आणि त्यामुळे सर्व परिस्थितीनं शांतीने स्वीकारावे. इथे शांती म्हणजे व्ययक्तिक भाव नसून तो सर्वांगीण, सूक्ष्म आणि विशाल असतो. व्ययक्तिक वावरणे आणि अशांत होणे, हे एकच आहे. तसेच सामूहिक वावरणे आणि शांत होणे एकच आहे.
ज्या प्रगतीमुळे व्यक्तीक सुधारणा होते, ती खरी सुधारणा नाही.
हरि ओम.
श्री
विचारांच्या स्वभावावर, परावलंबित स्थितीवर, इंद्रिये आणि देहाच्या हालचालींवर, साखळीवर, संबंधांवर टीका करून व्याकुळ होऊ नये किंव्हा अपेक्षा असू नये त्यांच्यामुळे.
जन्म हालचाल म्हणाल, तर अनुभव आले, विचार धारा आले, संबंध आले, अर्थ आले, अस्थिर भाव आले, स्मरण आले...ह्याला भगवंत इच्छा असे ओळखावे.
प्रवास शांतीने संपूर्ण स्वीकारावा लागतो आणि हालचाल म्हणजे कधीतरी शांत होऊ आपण हे विधिलिखित आहेच. सर्व भगवंतच आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home