श्री
श्री
_प्रकट_ होण्याचे कार्य एका शांत, सूक्ष्म माध्यमाचे गुण आहे, म्हणून ते सर्व होते आणि त्या होण्यामध्ये जसे स्मरण असते, त्या पद्धतीने त्या _कार्याशी संबंध_ जोडले जातात.
सर्व प्रवाह राहतो आणि त्यातून शांतता गवसायची असते. जेव्हा सर्वांचा प्रभाव विलीन होतो, तसे स्मरण होते, तेव्हा खरी शांतता संक्रांत होते आणि तळमळ मावळते. असा प्रवास प्रत्येकाच्या वाट्याला आलेला असतो. हा प्रवास आहे, (इथे वैयक्तिक जरी वाटत असले तरीही त्याच्या पलीकडे भाव होण्याचे कार्य), असे ओळखायला देखील काळ लोटला जाऊ शकतो.
वासना अनंत काळापासून आलेले असतात आणि ते गूढ पद्धतीने कार्य किंव्हा हालचाली घडवतात आणि स्मरण प्रकट करतात. म्हणून स्वतःच्या स्वभावाचे मूळ किंव्हा इतरांच्या स्वभावाचे मूळ, शांत झाल्याशिवाय, स्वीकारणे अवघड असते. मला वाटते की "मूळ" हा शब्द देखील "अस्तित्व" ह्या अर्थाने बघावा, तो एक बिंदू नाही, की संबंध नाही, की साखळी नाही. म्हणजे त्या स्वभावाला होण्यास काही व्ययक्तिक कारण नाही, तिला भगवत इच्छा निर्माण करते. म्हणून ते स्वीकारावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home