Monday, September 15, 2025

श्री

 श्री 


कशाने काय होईल, ते सिद्ध होण्यासाठी, स्वार्थी हेतू सांगण्यासाठी, अट्टाहास धरण्यासाठी सांगू नये किंव्हा प्रतिक्रिया देण्यासाठीही नाही. जे काही होते, ते शक्तीमुळे होते, हे ध्यानात ठेवावे. आपले होणे, अनुभवाचे स्थान, बदलांची जाणीव - सर्व एका शक्तीच्या कार्यामुळे *संक्रांत* होते. Those things *exist*. अस्तित्व म्हणलं तर क्रिया आली आणि ती निरहेतू असल्यामुळे (म्हणजे कुठल्याही रुपावर अवलंबून नसल्यामुळे) ते कार्य सुचविते. तसा भाव संक्रांत होण्यासाठी मनाला ते संस्कार द्यावे लागतात. तो भाव शांत, अदृश्य, विशाल, सूक्ष्म आणि स्थिर असतो. 

तो भाव अस्तित्वात असतोच, ज्याने आपण होतो. तो कसा कार्य करतो, हे ध्यानात नसते आपल्या. वृत्ती देखील सूक्ष्म असते आणि तिचे कार्य विचार आणि भावना प्रकट करते. वृत्ती कुठे गुंतुन राहते, हे सूक्ष्म झाल्या शिवाय उमगत नाही, म्हणून व्यक्ती अशी प्रतिक्रिया का देते, त्याचा स्वतः अभ्यास करावा, दोष देऊ नये दुसऱ्यांना. 

म्हणून शुद्ध होणे हा मार्ग आहे आपल्यासाठीचा. त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम.


श्री 

मन असते, विचार आणि भावना हे येत राहतात आणि निघून जातात. त्यातून संबंध होत राहतात, जाणीव वावरत राहते आणि कार्य घडत राहते. हे सर्व शक्ती करते, जे त्या शक्तीचे कार्य आहे, परिणाम आहे, वावर आहे, संबंध आहे, इच्छा आहे, भाव आहे. त्या कार्याच्या द्वारे "माझेपण" उद्भवते आणि त्या मूळ शक्तीचे कार्य "आपण विसरतो", म्हणून वेगळ्या स्मरणात आपण कार्य करतो. Imagination. त्याला आपण _अनुभव_ म्हणू शकतो. अनुभवाचे स्थान राहणार आणि त्याचा परिणामही. तरीही अनुभवाकडे प्रमाण म्हणून बघायला लागलो, तर मूळ शक्तीचे स्मरण अनुभवात संक्रांत होऊ शकते. 

माणूस चुकीच्या समजुतीमुळे खूप साऱ्या विचार आणि भावनांना बळी पडतो, त्यात गुंतून राहतो, त्रासिक होतो, कष्टी होतो. ह्या परिस्थितीत स्वतःला शांतीने स्वीकारणे आले. आपल्या आत संक्रांत झालेल्या प्रवाहाला हेतू नसतो, म्हणून कुठल्याही हेतूने व्यवहार करण्याची गरज नाही. बदलांचे स्वरूप असे का, हा प्रश्न हेतू दर्शवतो. परिस्थिती, हालचाली कसेही झाले, तरी त्यास व्ययक्तिक नजरेने बघू नये. त्यासाठी सूक्ष्म होणे आले.

आणि त्यासाठी नामाचे स्मरण ध्यानी ठेवावे.

हरि ओ

0 Comments:

Post a Comment

<< Home