श्री
श्री
आपल्यात आणि दुसऱ्यात फरक नसतो. "फरक" करून घेणे, ही संकल्पना आहे, जिला आपण धरून ठेवतो. तसे पाहिले तर मन ही शक्ती आहे, जी साखळीतील, विविध घटक ह्यांच्यातून, वृत्तीतून, विचारातून, भावनेतून, देहातून व्यक्त होत असते आणि परिणामी दृश्य भासून त्यात गुंतून राहते. एकंदरीत ह्या क्रियामुळे "मी" आणि त्यामुळे "इतर सारे" असा संबंध निर्माण होतो आणि व्यवहारात राहतो, स्मरण ठेवतो.
स्मरण, म्हणून अहं वृत्तीतून येते किंव्हा सर्व घटक शांत झाले, तर ते स्मरण स्वतः ओढून घेतलेल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन सत्यात रूपांतर पावते. म्हणजेच "मी" संकल्पना सूक्ष्म होणे, शांत होणे अभिप्रेत आहे...म्हणजेच शुद्ध अस्तित्व होणे, त्या होण्याचा अनुभव संक्रांत होणे, स्थिर होणे.
मनाचा गुण असा आहे, की तो अस्थिर असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टींकडे खेचला जाऊ शकतो (तात्पुरतेपण भासल्यामुळे) म्हणून अनुभव येत राहतात आणि त्याचा परिणाम किंव्हा भोग झेलायला लागतो. इथे थांबवणे अशक्य आणि पळून जाणेही अशक्य. जे आहे, ते स्वीकारावे आले. आणि ते योग्य असावे, कारण त्यातून मार्ग आणि स्थिरता हे अनुभव संक्रांत होऊ शकतात. स्थिर होणे ही अवस्था अभिप्रेत आहे, ती कदाचित नैसर्गिक वाट असावी जीवाची. नैसर्गिक जरीही असली, तरी खूप साऱ्या अनुभवातून ती वाट आपल्याला नेईल - इकडे तिकडे, वरती खाली, डावे उजवे, सरळ वाकडी, स्थिर अस्थिर, अंधार उजेड, आकुंचित विशाल, थोडे मोठे वगैरे. ह्यातील सारे अनुभव गुंतलेले आणि प्रवाहाचे मानावे. म्हणून कुठेही जरुरी पेक्षा जास्ती गुंतून राहण्याची तशी जरूरी नसते आणि कुठलीही स्थिती कुणासाठी थांबत नसते, हे ही सत्यच आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home