श्री
श्री
विचार, ही स्पंदने एका क्रियेतून येतात, ज्याचे घटक वृत्ती, भावना चक्र, देह असे असतात. शक्तीचे एक स्वरूप म्हणजे _विचार_. ह्याने स्मरण होते, भाव होते आणि भगवत कार्याला विसरण्याची शक्यता _निर्माण_ होते. म्हणजे कुणी हे मुद्दामून करत नाही, पण ह्या कार्यातूनच हे घडते, तसे होते, तशी भूमिका घेतली जाते, तसे वावरणे होते, तसा गुंता होतो, तश्या विचार धारा येत राहतात. त्यातून जे दृश्यात येते, भावना मिसळलेले जातात आणि त्याच्यात आणखीन विचार करत वेगळेपण, तात्पुरतेपण, भीती अशा साऱ्या गोष्टी येत राहतात. म्हणजे मन इकडे तिकडे धावते. आणि कितीही जोडण्याचा प्रयत्न केला, तरीही विषय काही सुटत नाही, विषय मोकळे होत नाहीत, समाधान काही मिळत नाही, भाव काही शांत होत नाही.
हे आत्मसात करणे महत्वाचे आहे, कारण आपण आपली शक्ती उगाचच वाया घालवतो विचार करून आणि भावनेत गुंतवून आणि संबंध निर्माण करून. दुहेरी तलवार असल्यामुळे, जसे भाव ठेवू, तसे परिणाम आत प्रकट होतात आणि परिस्थिती भासते. कुठे थांबावे, काय जोडावे, काय दुरुस्त करावे, कुठल्या बिंदूवर लक्ष केंद्रित करावे, ह्याचा ठाम पत्ता लागणे कठीण. कधी आपण विषयाधीन होते, हे कळणे कठीण होते. नुसते बसून राहायचे म्हणले तरी खूप विचार येत राहतात!
देहाशी आणि दृश्याशी संबंध ठेवल्यामुळे प्रकट होणाऱ्या विचारांचे एक _रूप_ असते. त्यातून स्मरण होते. विचारांनी शांती भाव प्रकट करायला हवा आणि त्यासाठी सर्वांगीण चिंतन महत्वाचे मानावे.
वरील गोष्ट महत्त्वाची आहे, कारण विचार म्हणजे विघटित क्रिया ठेवल्यामुळे अनुभवास प्रचंड वेग, बदल, बेचैनी, त्रागा, कष्ट सोसावे लागतात. Super specialization करून कुणाचे भले झाले आहे?! जेवढं पूर्णत्वातून तोडले किंव्हा खंडित केले जाईल, तेवढंच त्रास वाट्याला येईल. आपण भगवंताच्या भावनेपासून वेगळे राहू शकणार नाही. त्यासाठी आपली वृत्ती शांत करणे महत्वाचे आहे.
बऱ्याच जणांना वाटते की विचार म्हणजे माझे स्वातंत्र्य...मी काहीही करायला मोकळा. हा प्रश्न खूप आत न्यायला लागतो. संबंधित असणे आणि परावलंबी असणे हा काही कमकुवतपणा नाही किंव्हा न्यूनपणा नाही. त्यातून शांतीचा मार्ग आत्मसात होणार असतो...तोडून नाही.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home