Wednesday, November 05, 2025

श्री

 श्री 


विचारांवरून तसे संबंध, चक्र, परिणाम निर्माण होतात, तसे स्मरण होते आणि तसे अपेक्षा होतात, स्पष्टीकरण भाव प्रज्वलित राहते. हे कार्य म्हणावे, जे व्यक्तीवर ठरत नाही. ते कार्य असते, म्हणून त्यातून व्यक्ती होणार अनुभव होणार, परिणाम होणार, प्रश्न येणार, शोध होणार. 

असणे आणि होणे, हे भगवत कार्य आहे, म्हणून त्याचा परिणामही स्थित असणार. 

मी, ही संकल्पनाच खूप मर्यादित आणि निर्माण झालेली आहे. त्यातून सिद्ध का करावे आणि कुठल्या माध्यमातून हा फुकट हेतू असतो. 

प्रश्न असणार, खूप त्रास होणार वगैरे. त्यातून योग्य संकल्पना समजून घेणे किंव्हा ओळखणे आणि मार्गाला लागणे. 

कुठलीही गोष्ट किंव्हा माहिती मिळाली, त्यातून त्वरित काहीतरी करणे काही अभिप्रेत नसते. बरेच जण नुसते बडबड करण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी बडबड करत राहतात. त्यात त्यांना सल्ला,अभिप्राय, निर्णय, कुठलेही विचार तसे हवे नसतात. 

कुणी काही म्हणो किंव्हा काहीही नाही...
त्यातून स्वतःला खरच फरक पडता कामा नये. भोग असले काय किंव्हा तसे, परिस्थिती अशी झाली काय किंव्हा तशी....ह्यातून निष्पन्न तसे काही होत नाही. जसे असेल तसे असू द्यावे आतील आणि बाहेरील परिस्थिती. कुठल्याही आतील, बाहेरील, सबंधित स्थितीवरून आपण ठरत नाही. अनुभव होतो. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home