श्री: शक्ति
श्री: शक्ति
विचार येत राहतात, कार्य घडत राहत, परिस्थिती घडत राहते, आपण होत राहतो, उत्तर शोधत राहतो, आणि हे अनंत काळ प्रत्ययला येत राहत. आपण जन्म पहिल्यांदा घेत नसतो आणि हा शेवटही नसतो. वृत्ती उद्भवते आणि मावळलते. त्यातूनच आपल्याला दृश्याच्या गोष्टी भासत राहतात आणि आपण बुद्धी आणि मन वापरत राहतो हे सर्व समझुन घेण्या करता. हा एक विलक्षण प्रकार आहे आणि अति सूक्ष्मातून उगम होऊन पूर्ण विश्व तैय्यार करणारा आहे! त्याची सुरवात अनाकलनीय आहे, शेवटही अनाकलनीय आहे आणि आपण आणि विश्व हि “मधली स्थिती” जाणवत राहते. त्याची भीती आपल्याला वाटते. हे सांगून सुद्धा बौद्धिक पातळीवर गोष्टी कळू शकतात पण अनुभवावरून पलीकडे जाणे हे मात्र करायला लागत.
भगवंत अति सूक्ष्म वस्तू आहे ज्यात
एकपणा आणि बदल नाही. त्याच्या मध्ये निर्माण होण्याची “शक्ति” (potential) विसावलेली आहेच. शक्ति आणि भगवंत वेगळे नाही. भगवंत म्हणालो
तर शक्ति आलीच आणि शक्तीचा उल्लेख केला तर त्याला आपल्याला “भगवंत” त्या नावाने
संबोधित करायला लागत.
थोडक्यात म्हणजे भगवंत आहे
अस्तित्व ज्याच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता आणि शक्ति आणि ज्ञान पूर्णपणे आहे.
त्या शक्ती आणि कार्याच्या माध्यमातून सर्व विश्वातील घडामोडी होत राहतात. त्या
विश्वाचा एकच छोटासा ठिपका आपण असतो! एकच माध्यम असल्यामुळे त्याच ठिपक्याला स्वतःच्या
शक्तीचा अंदाज करून घेता येतो आणि तेच शक्तिरूप तो बनू शकतो! जीवनाच सार समझुन
घ्यायच असेल तर ते हेच कि आपण भगवंत सारखं होऊ शकतो, आपण भगवंतच आहोत – हे आपण
जाणून घेऊ शकतो!
ह्याला खूप सय्यम लागत. इतर वेळेला
आपण खूप विचारांच्या मागे पळत राहतो कारण वृत्ती आपल्यावर ताबा मिळवते! वृत्ती
भगवंताचीच आहे आणि ती जे काही उद्भवते त्याला स्वीकारणे आपल्या हिताच ठरत. गीष्टी
घडतात, ते का, कस, कधी, कुठे, कुणामुळे -
अशे असंख्य प्रश्न आपली मनोवृत्ती निर्माण करत राहते कारण भगवंत आपल्याला कळलेला
नसतो.
जे काही आपण विचार करतो, जे काही
वाटत, जे काही ऐकतो, जे काही बोलतो, जे काही घडत – ते भगवंताच्या अस्तित्वामुळेच
असत. आपण उगाचचं चिंता आणि त्रास करून घेत असतो. गीष्टी फक्त जाणवायच्या असतात,
त्रास करून घ्यायचा नसतो. त्यासाठी भगवंताची जाणीव वाढवायची असते.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home