Friday, June 16, 2023

श्री: वृत्ती

 

श्री: वृत्ती

सगळ्या गोष्टी वेळेवरच व्हायला पाहिजेत हा अट्टाहास धरण्याची काही गरज नसते. (म्हणजे गोष्टी आपल्यावार आवलम्बून असतात हा एक भ्रम आहे). आपण कीहीही कृती करो, काहीही बोलो, गोष्टी जेव्हा होणार असतात, तेव्हाचं होतात. गोष्टी “होणे” हे बर्याच प्रकारे घडत आणि एकाच प्रकारे गोष्टी घडायला लावणे किवा तशी इच्छा व्यक्त करणे हे भीतीच आणि अभिमानाच लक्षण आहे. अभिमानाचं मूळ वृत्ती मध्ये असत आणि तेही निर्माण का होतं ते भगवंताच्या इच्छेने. इच्छा ला आपण वृत्ती म्हणू शकतो किवा काहीतरी होण्याची क्रिया, बदलण्याची क्रिया, घडण्याची क्रिया, अनेकपणा भासण्याची क्रिया. वृत्ती आपली बुद्धी, मन आणि शरीर तैय्यार करते आणि आपल्याला कार्य करायला भाग पाडत राहते. आपले विचार, संभ्रम, द्विधा मनस्थिती, भीती, आकांक्षा सर्व काही ह्या वृत्तींमुळे उद्भवत राहत. आपण जे अनुभवतो, जे बघतो इंद्रियांमुळे, त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि बुद्धीवर होतो किवा हे सर्व वृत्तींचा खेळ आहे. परिस्थिती अशी का झाली आणि व्यक्ती अशी का वागली आणि का बोलली आणि आपण का दुखावलो गेलो, त्याच्या मागे एकंदरीत विश्व वृत्ती आहेत. त्या इतक्या सूक्ष्म आहेत, कि आपले विचार आणि अभिमान त्यामुळे कसा डोकं वर काढतो हे पूर्णपणे आपल्याला काळत नाही. त्याची भीती वाटते. हे कदाचित मनोरचनेचा भाग आहे – as natural as any other thing of imagination or of existence.

“काळ” ह्या संकल्पनेला आपण कशे बघतो, हे देखील आपल्या मनोरचनेवर आधारित आहे. काहीतरी करत राहणे किवा करून दाखवणे – हा ही वृत्तीचा भाग आहे आणि आपल्या मध्येच आनंद भोगणे हा ही मनस्थितीचा भाग आहे. भगवंत ओळखावा लागतो आणि त्यासाठी आपली मनस्थिती व्हायला लागते. आपली तैय्यारी असायला लागते तरच सत्यचं आकलन आपल्याला कळू शकतं.

साऱ्या गोष्टी, संकल्पना, मानवी संस्कृती, विचारांची ठेवण आपण ह्या पार्श्वभूमी वर बघू शकू का? मुळात वृत्ती ला शांत करणे म्हत्वाच. वृत्ती उफाळून आली तर असंख्य संस्कृती निर्माण होतात. आपण एखाद्या संस्कृतीला “developed” म्हणू आणि दुसर्याला “developing”, पण सर्वांच्या पोटाशी भीती असते. वरवरच व्यक्तीने प्रगतीचा कितीही तांडव केला तर ते निव्वळ ढोंग आहे – त्याच्यानी वृत्ती काही मावळत नसतात. उलट ते विचित्र प्रमाणे वाट शोधत उफाळून येतात – जसं कि एखाद्या पाणीच स्त्रोत बुजवल तर ते अनपेक्षितरित्या जोमाने दुसरीकडे बाहेर येऊन हाहाकार माजवतात. त्यांनी हे सिद्ध होतं कि आपण स्वतंत्र नसतो – तु, मी हा ढोंगीपणा आहे. सर्व एकच माध्यम आहे तर आपण जे काही विचार करू, त्याचा परिणाम खोलवर आणि सर्व व्यापी असतो. काही दुरुस्त किवा जगाला काहीतरी करून दाखवण्याची अजिबात गरज नसते. दुरुस्त करायचच झालं तर आपल्या मनाला पहिले आवरण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि त्यासाठी औषधाची गरज आहे – भगवंताची.

भगवंत म्हणजे अस्तित्व. आणि तोच पूर्ण विश्वाचा आधार आहे आणि तोच एक सत्य ठेवा आहे. त्याची आठवणीची नितांत गरज आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home