श्री
श्री
अस्तित्व असत. त्यात सर्व काही
घडतं – वृत्ती पासून ते आकारापर्यंत. तस बघितलं तर सर्व दृश्य जगात आपण वावरत असतो
– वस्तू काय किवा भावना काय – सर्व वृत्तीची माया आहे. प्रपंच सोडवा म्हणून सुटत
नसतो, टाकून द्यावा म्हणून टाकता येत नाही, बंद करावा तरी बंद होत नाही. प्रपंचात
परमात्म्याची जाणीव आणायला लागते तर तो बाधत नाही. सर्व आपण हे कशासाठी आणि
कुणासाठी करतो? आणि करणारा “मी” कोण? हे प्रश्न महत्वाचे आहेत. आणि जो पर्यंत नेमक
काय प्रकार आहे हे उमगत नाही, तो पर्यंत आपण चिंतेत राहतो.
काहीही हरकत नाही. काहीही पदरात
पडल – दुख असेल किवा सुख, ते स्वीकाराव आणि भगवंताची आठवण सतत असावी. बदल आपण
नाही. परिस्थिती आपण नाही. विचार आपण नाही. आपण कुणीच नाही. सर्व काही तोच घडवतो.
आपण फक्त त्यात जगतो. अस का असत ते माहीत नाही. पण आपल्यामध्ये त्या भगवंताचा औंश
आणि शक्ति आहे, तर आपण तोच आहोत कारण तोच एक सत्य आहे.
कार्य करत रहावे. त्यातून काय होईल
ते भगवंतावर सोपवावे. कार्यचे कार्तेपणा आपाल्याकडे घेऊ नये – यश असो किवा
अपयश - सर्व त्या भगवंताच आहे.
अभिमान तस म्हणल तर वाळवी सारखी
आपल्याला पोखरते. अभिमानामुळे आपण संकुचित होतो आणि काहीही स्वच्ह मनाने देत नाही.
मोकळेपणा अंगभूत असायला हवा. मी घेऊन किवा देऊन काहीही फरक पडत नाही. म्हणजे आपण
फक्त देत रहाणे आणि आनंदात रहाणे. भगवंत आहे आपल्या मागे, बरोबर आणि पुढे. मोकळेपणा
विचारातून येत नाही – श्रद्धेने येतो.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home