Saturday, June 17, 2023

श्री

 

श्री

सर्व काही मनोराचानेवर आधारलेल आहे. ती मनाची स्तिथी सत्व, रज आणि तम ह्या गुणांवर आधारलेली आहे. हे गुण वृत्तीन मधून जाणवतात आणि वृत्ती भगवंताची निर्मिती आहे किवा त्याचा एक अंग आहे. आपण मूळ असू शकत नाही, आणि जे भासत राहत, जे दिसत ते निव्वळ वृत्तींचा खेळ आहे किवा प्रभाव आहे. वस्तू दिसते म्हणजे तरी काय? विचार येतात आणि तसेच का उद्भवतात म्हणजे काय? विचारांवरून परत काहीतरी घडत राहत आणि त्याचा परिणाम आपण करून घेतो म्हणजे काय?

ह्या असंख्य परावलंबित गोष्टींना आपण “कार्य” म्हणू शकतो. आपण कुठे अलोत, कुठे जाणार आहोत, काय करत असतो आणि का  - ह्याची समाधानकारक उत्तर आत्ताची बुद्धी वा मन देऊ शकत नाही कारण ते दृश्याच्या प्रभावाखाली विचार करत राहत. म्हणजेच कि जे “दिसत” त्याला ते “सत्य” मानत आणि तशेच निर्णय घेत राहत. त्या दिसण्यामध्ये बदल आहे, परावलम्बित्पणा आहे, भीती आहे, आकांक्षा आहे आणि प्रेमही आहे. ह्या प्रभावाखाली बुद्धी आणि मन काम करते आणि अनुभव निर्माण करते. ते इतक खरं वाटत राहत कि सर्व विश्व बनावट आहे हे आपण कबुल करत नाही. ह्यालाच “मीपणा” किवा अभिमान म्हणतात.

आपल्याला सुधारण्याची गरज आहे. म्हणजे पवित्र होण्याची आणि स्वतंत्र आपल्यामध्येच आनंद उपभोगण्याची. त्यासाठी सूक्ष्म होणे गरजेच आहे, कारण भागवत वस्तू सर्वात सूक्ष्म आणि स्वतंत्र आणि सत्य आहे. तोच विश्वाचा निर्माता आहे आणि तोच विश्व चालवतो आणि अनेकपणा निर्माण करतो. वृत्ती त्याची आहे म्हणून त्याच्या जवळ सर्व काही केंद्रित करा.

हरि ओम.

 

श्री

गोष्टी जेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाही, तेव्हा आपण नाराज होतो आणि एक विचार येतो कि “अस झालं असत तर आणि हि परिस्थिती टाळली असती तर आणि काही निर्णय अगोदर घेतले असते तर?...”

हा विचारच मूळ अभिमानामध्ये आहे – आपण सर्व करता अशी समजूत आहे इथे. आपली इच्छा दोषित आहे कारण ती बदलणारी, परावलंबी आणि स्थूल आणि दृश्य मध्ये वावरत असते. हा एक स्वाभाव झाला. त्याचा त्रास आपल्यालाच आहे!

वास्तविक अस्तित्व भगवंताच आहे आणि सर्व गोष्टी दिसण्याच्या, अनुभवण्याच्या आणि होण्याच्या मागे तोच एक सत्य आहे. अस पचनी पडल तर सर्व इच्छा त्याच्याच आहे आणि सर्व कार्य त्याचच आहे. तर जश्या गोष्टी जाणवतील, सामोरे येतील आणि अनुभवतील – त्यामागे तोच आहे. विचलित होण्याच काहीही आणि कुठलही कारण नाही.

कोण म्हणत कि “विचार” असे केले कि त्यावरून अश्या गोष्टी होतातच?! विचार हि                            मनाची स्थिती आहे – त्या मध्ये एक जाळ आहे, बदल आहे, कृती आहे, अभिमान आहे. वृत्ती आपल्या ताब्यात नाही, ते विचार घडवणारच, त्यातून बुद्धी, मन आणि शरीर कार्य करणारच आणि आपण अनुभव घेणारच.

भगवंतात कुठलीही वृत्तींच जाळ तैय्यार करते आणि त्यावरून कुठलीही बदलणारी परिस्थिती निर्माण होत राहते. म्हणजे कुठल्याही कृती मागे आणि परिस्थिती मागे “ठोस” कारण नसतं. म्हणून आपण कसेही असो आणि काहीही वाटो, त्याला न्यूनपणाने बघण्याची काहीही गरज नसते आणि अभिमान बालगण्याचीही अजिबात नाही. हा विचार पचनी पडला कि आपण समाधान पावतो. म्हणजेच आपण स्थिर होतो.

हरि ओम.

 

 

0 Comments:

Post a Comment

<< Home