श्री: अभिमान जाळणे
श्री: अभिमान जाळणे
आपण आहोत अस्तित्वात. आणि अस्तित्व
सध्या आपल्यासाठी एक स्थिती आहे ज्या मध्ये बदल, परावलंबन, आकार, येणे, मावळणे,
बुद्धी, मन, शरीर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. स्थिती म्हणजे भाव किवा असण्याची एक
पद्धत. हि निर्माण होत राहते आणि मावळते आणि प्रत्येक निर्मिती मध्ये परिस्थिती,
नाती – गोती वगैरे घटक होत राहतात. निर्मिती हि भगवंतामुळे होते –ज्याच्या मध्ये
वृत्ती निर्माण होण्याची क्षमता आहे. वृत्ती हे आपण शब्दा मधून संबोधित करतो आणि
ज्यातून प्राण (बुद्धी-मन) आणि आकार (शरीर) तैय्यार होतं राहत. ह्यातूनच अनेकपण
निर्माण होतं. सगळा खेळ भगवंताच्या इच्छेचा/ निर्मितीचा/ क्षमतेचा आहे. वृत्तीतूनच
अहंकार निर्माण होतो आणि तो इतका सूक्ष्म पद्धतीने असतो कि त्याच बाह्य स्वरूप
म्हणजे शरीर किवा इंद्रिये आणि सर्वात आतल सूक्ष्म रूप म्हणजे वासना. आपल्या
आकलनाचा विस्तार वासना ते शरीर ह्या अंगा मधून तैय्यार होत असतो. आणि हा विस्तार एका
बिंदू पासून ते सार विश्व साकारत.
म्हणून गोष्टी कश्या घडतात आणि का
आणि ते कस समजून घ्यायला हव आणि कार्य कस करायला हव – हा एक अभ्यास आहे. तो अभ्यास
केला कि आपण परिस्थितीच्या पलीकडे जातो आणि पूर्ण होतो. वृत्ती हे ज्ञान निर्माण करुन
देते. ते ज्ञानाच बिंदू शरीर असू शकतं किवा आत्मा.
आत्मा म्हणल तर त्यात वृत्ती स्थिरावलेली
असते (किवा ती उमटत नाही). इथे आपल्याला पोहोचायचंय. तर सुरवात आणि शेवट हि भागवत
वस्तू आहे, आपण नाही!
आपल्या दररोजच्या परस्थितीत, तीन
गोष्टी करायच्या आहेत – (१) नितीधर्माचे आचरण – फळाची अपेक्षा किवा संकुचित वृत्ती
मधून कार्य न करणे (२) पवित्र अंतःकरण – चांगले विचार, सर्वांसाठी विचार, (३)
भगवंताचे चिंतन - निर्माता तो आहे, तर
त्याला विसरून कस चालेल? अभिमान म्हणजे भगवंताचा विसर. त्या भगवंताला आत्मसाद करणे
म्हणाजे अभिमान जाळून टाकणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home