Shree
Shree
The most important aspect that I
need to continuously engage with as much as I can is - connections with
patterns that favour life. This means love, organic planning, slowness, being
available, undestanding pain and trauma, being non judgmental. Whether that
fetches money or not I will not care I guess in the long run – money or security
will take care of itself if the action stems from pure love. The basis is the
feel of satisfaction which is beyond time and space and thought and language
and connects with patterns. How can this be told and made to believe by people?
This is not a game of demonstration or of exhibitionist approach or of any
noise making gimmick. At best it asks for nothing, is subtle and silent and
does its own job without a hint of approval from anyone. Seeking approval
perhaps then becomes detrimental to this feeling, since approval seeking
becomes conditional and hence bespeaks of tainted love.
वृत्ती श्री कडून आहे तर त्यालाच परत द्यायला हवी
किवा त्याच्याकडे केंद्रित करायला हवी. मी कुणीच नाही आणि देव सोडून कुणासाठीच
नाही. तसं म्हणल तर भगवंताशिवाय जग अस्तित्वात येत नाहीच. आता आपण वृत्ती, मन,
शरीर, जग सगळ वेगळ मानतो आणि भगवंत दुसरीकडे. कुठलीही गोष्ट आणि त्याचा उगम आणि
हेतू, भगवंताच्या संकल्पनेशिवाय शक्य नाही. अस्तित्व आहे त्याच आणि म्हणून आपण
निर्माण होत राहतो; जग दिसतं राहत, दृश्य प्रकट होत राहत वगैरे. कुणा विरुद्ध आपण
भांडत राहतोय आणि घाबरतोय? आपल्याच सावलीशी आपण खेळत राहतो. भगवंत दृश्यात नाही,
पण सार जग त्याच्यातूनच उद्भवलेल आहे. एका अर्थी दृश्य म्हणजे अपूर्ण, असत्या,
तात्पुर्त स्वरूप अस्तित्वाच आणि म्हणून त्यात बदल आणि आकार होत राहतात. आपणही
अपूर्ण असल्यामुळे आकार घेऊन येतो, अनुभव जगाचा घेतो आणि मावळतो – हे चक्र सुरु
राहत. आपला जन्म वासनेत झालं आहे (मनाची स्थिती) म्हणून आपण शांत व्हायलाच पाहिजे
जेणे करून सत्य जाणवेल. पूर्ण जग दिखावा आहे, त्यात घडणाऱ्या गोष्टी असत्य आहेत,
काल्पनिक आहेत, भावनिक आहेत, दृश्याच्या चौकटीत आहेत, स्थूल आहेत वगैरे. जे दिसतं
ते आतल जग किवा वृत्तींमुळे परिणाम करतात. दिसणे हि बाहेरची क्रिया नाही – ती आतली
स्थिती आहे. तरीही त्याचा स्वीकार करायलाच लागतो आणि त्यावरून आपण पलीकडे जाऊ
शकतो. म्हणून शांत मनाने सर्व गोष्टी अनुभवायच्या आणि कुणावर आणि कश्यावर चिडायचं
नाही. जे होणार ते होणार.; जे विधीलीखीत आहे, ते आपण सोसणारच. कुठेही पळण्याची
जरुरी नाही. सर्व करता राम आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home