श्री
श्री
श्री, आपण म्हणजे विचार नाही –
त्याच्या पलीकडे आहोत. विचार करून आपण सिद्ध होत नाही = फक्त तुझी शक्ति प्रकट
होते. घाबरणे किवा चिंता करणे हे अपुर्णत्वाच लक्षण आहे किवा त्याच भावनेला महत्व
देण्यासारख आहे. असंख गोष्टींची आम्ही चिंता करतो, श्री. कुणी काय बोलेल; काय
विचारेल; त्यातून आपण पूर्ण कसे ठरू किवा अपूर्णता कशी पुढे येईल, किती काम करणे,
किवा नाही करणे, कसं बोलणे, किवा नाही बोलता येणे, वेग, काळ, स्थळ, मर्यादा,
अट्टाहास, वायफळ बडबड करणे, किवा बोलणे, चक्क टाळणे, विभागणी करणे किवा न करणे,
कामाचा आव आणणे, उद्या काय होईल किवा असच होईल अशी अपेक्षा बाळगणे, हेतू बद्दल
शाश्वती नसणे, आणि मुख्यतः सत्य नाही ओळखता येणे आणि जे “दृश्यात भासणे” त्याच्या
नादी लागून खूप काही भोगणे. तसं पहिले तर गोष्टी घडण्यामागे सूक्ष्म शक्ति, तुझीच,
कार्यक्ष्म असते - ज्याला आपण स्वच्ह
ज्ञान, हेतू, स्थिरता अशी उपमा देऊ शकतो. जेव्हा तुझी शक्ति दृश्यात अवतरते तेव्हा
त्याला अनेक हेतू, वृत्ती, विचार, भावना, गुण “आकार” देतात आणि मग आम्ही तुला
विसरतो! काय तुझी माया आणि लीला! The “creation of the
form” is a Divine act or coming from the presence of Existence. म्हणून
बर्याच संकल्पनेतून आणि बर्याच सूक्ष्म शक्तीतून गोष्टी घडून येतात, बदलतात,
मावळतात आणि ह्या सर्व घटनां मधून आपण (मानव) काही सिद्ध होत नाही, किवा विचारांची
व्याख्या निर्माण होत नाही किवा विचार म्हणजे अस आणि तसं – अस
समीकरण आपण वापरू शकत नाही किवा आपण स्वतः कोण हे विचारांच्या पातळीवरून कुणालाही
ठरवता येत नाही. तशी करण्याचीही गरज नाही कारण सर्व संकल्पना तुझ्या अस्तित्वातूनच
येत आहे, तर त्याला बाळंतपण करणारा आणि गोन्जवणारा मी कोण?!
आपण का आलो आहोत आणि काय करण्याचा
प्रयत्न करत आहोत हे ओळखायला लागत – त्याच चिंतन करायला लागत आणि योग्य असे
संस्कार मनाला सतत द्यायला लागतात. संस्कार खूप सूक्ष्म पातळीपासून उद्भवत असतात
म्हणून ते अनंत काळ चालून आलेले असतात किवा त्याचा परिणाम खूप काळ टिकून असतो. हे
वरवरचे बदलत्या गोष्टींना तसं काहीही मूल्य नाही आणि काही ठोस कारण नाही कि ते
ह्या क्षणी इथेच का पाहिजे. म्हणजेच आपण गोष्टींना मूल्य देऊ शकतो आणि जे पटत तेच
केलेलं योग्य आहे. शेवटी सर्व गोष्टी तुलाच येऊन संबोधित होतात पण म्हणून आमचं
कार्य काही टळत नाही, हो ना?! तु आम्हाला कार्य करायला निर्माण केल आहेस, तर
आम्हाला ते करणे भाग आहे. तुझीच इच्छा कार्यक्षम आहे, म्हणून हा सारा जगाचा घाट!
तसच काय केल्यामुळे काय होईल किवा
निर्माण होत राहील = ह्या बद्दल तुझाच
विचार हवा. तुझा विचार म्हणजे तुझ्यावर श्रद्धा आणि निव्वळ प्रतिभा ह्या धारणेतूनच
कार्य झालेलं बर.
आम्हाला तुझ्या पर्यंत पोहोचो आणि
तुझ दर्शन घडवून आण!
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home