श्री
श्री,
म्हणजे सर्व गोष्टींची स्थिती, गुणधर्म, स्वभाव, संबंध, एका भगवंताने निर्माण केले आहेत. सर्व त्याची इच्छा आहे, संकल्पना आहे. मग त्यात आक्षेप का असावे?
भगवंताचे कार्य हेच की त्यातून निर्मिती होत राहणे, स्थितीचा संबंध असणे, गतिमान होणे, गुण असणे, चक्र निर्माण होणे. हे होणार, ते मान्य असो किंव्हा नसो, कारण तेच " सत्य " आहे, जे आपल्या भावनांवर निर्भर नाही.
आपला स्वभावही त्याच्यातून आला आहे, हे विसरू नये. म्हणून गोष्टी आकारास येणे, हे त्याच्या अस्तित्वाच्या शक्तीवर सोडणे आणि आपण शांत होणे, बघत राहणे, श्रद्धा ठेवणे.
अस्तीत्व असणे हे सत्य आहे, म्हणून आपण झालो आहोत. गती धारण झाली आहे, आकार आला आहे, गुण घेऊन आलो आहे, संबंध जोडले गेले आहेत, स्थळ आणि काळ पदरी आले आहेत...ह्या सर्व गोष्टी शांत होत असताना मान्य होतात, किंबहुना मान्य होणे म्हणजे ती स्थिती धारण करणे. Therefore as long as there is some movement or vibrations, there is resistance of becoming the Truth, there is separation. But perhaps resistance is necessary for creation to become tangible! Hence the place (and importance) of struggle in our lives.
हरि ओम

0 Comments:
Post a Comment
<< Home