श्री
श्री
वेगळं दिसणे वस्तू म्हणून त्याने मनाचा स्वभाव कळतो. सर्व एक आहे, त्यातून अनेक, संबंध, वस्तू, वृत्ती ह्यांची गती निर्माण होते - शक्तीच कार्य. वेगळी वस्तू दिसली की त्यात गुंतागुंती आली, वृत्ती आल्या, अर्थ आला, बदल आला, संबंध आले आणि अहं किंव्हा हेतुरहित स्वतंत्र भाव आला. ती वस्तू आपल्यावर आणि आपण त्या वस्तूवर अवलंबून असतो आणि शिवाय स्वतंत्र असण्याच भाव देखील दोघेही पत्करतात. म्हणजे ज्याला आपण स्वतंत्र भाव समजतो, तो खरा परावलंबी असतो - खूप स्तरांवर, स्थितीतून निर्माण झाला असतो. त्या निर्माण होण्यामुळे जाणीव चौकटीत वावरते आणि अहं चक्र दर्शवत राहते.
काहीही केलं, किंव्हा कुठलाही विचार केला, तर तो एकातून, सत्यतून, पलीकडून, सुक्षमाच्या अस्तित्वामुळे निर्माण झाला असतो आणि तो आपल्या मनात वावरतो. म्हणून विचारांना येऊ देणे आणि जाऊ देणे, कारण ते होत राहणार. विचार माझे नाहीत, विचार मी नाही, विचार मानवाची देन नाही, स्थळ आणि काळ आणि अनुभव त्यावरून मी नाही, दृश्य मी नाही, इथे किंव्हा तिथे मी नाही, कृती मी नाही, बदल मी नाही, साखळी मी नाही, निर्मिती मी नाही, भावना मी नाही, रंग आणि रूप मी नाही, निर्णय मी नाही, अर्थ मी नाही, शंका मी नाही, उत्तर मी नाही, प्रश्न मी नाही, सिद्ध होणे मी नाही, सिद्ध नाही होणे मी नाही, गरज मी नाही, संकटे मी नाही, त्रास मी नाही, जवाबदारी मी नाही, डोळे मी नाही, आवाज मी नाही, ऐकणे मी नाही, बदल मी नाही....मी, मी ही नाही.
असेच विचार हवे असा अट्टाहास का धरावा?! आपल्या प्रवासात कुठे, कसे, केव्हा विचार निर्माण होतील ह्याची जवाबदारी आणि सिद्धता आपण का धरावी? त्याने आपण ठरतो का?!
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home