श्री
श्री
वृत्तीला स्थिर करणे हे अभ्यासाने होऊ शकते. ते करण्यासाठी चिंतन, भावना, बुद्धी, देहाचं कार्य हे वापरणे. कुठल्याही मार्गाने किंव्हा सर्व मार्गाने ते करावे, मनाला संस्कार देणे. वृत्तीचा परिणाम खूप सूक्ष्म स्थितीतून सुरू होतो. तो परिणाम असा आहे, की तो दृश्यात किंव्हा मनात येई पर्यंत चंचल, अस्थिर मन तैय्यार करून सतत तात्पुरत्या भावना निर्माण करत राहतो. त्या भावनेच्या गतीवर आपण कृती करतो, अपेक्षा निर्माण करतो आणि दुःखी होतो. म्हणजे "मी" होणे हे त्यातील एक अंग आहे. तर "मी" शाश्वत नाही आणि परावलंबी आहे. आणि हा खेळ भगवंताच्या इच्छेने मांडला गेला आहे. भगवंताची इच्छा म्हणजे "निर्मिती" क्रिया आणि त्यात अनुभव होणे ही क्रिया. म्हणून उगाचच चिंता करू नये, त्यात काहीही तथ्य नाही.
दुसरी गोष्ट अशी की खोलवरचा परिणाम - ह्याला स्थान आहे अस्तित्वात. विचार, भावना त्यासाठी करावेत, की खोलवर कुठेतरी त्यांचा परिणाम होतो आणि अनेक गोष्टींना निर्माण करतो आणि ते परत आपण अनुभवतो. सूक्ष्म ते स्थूल होणे आणि परत सुक्ष्मात परिवर्तन पावणे हे असणार. त्याने हे सिद्ध होते की माझा म्हणून आपण वावरतो ते एका स्तरापर्यंत मर्यादित राहत आणि ते सुद्धा अर्धवट. अर्धवट अश्या करिता की त्याला एक "परिणाम" म्हणून समजला हवा, ज्यात बुद्धी आणि भावनेची क्रिया होत राहते. ती क्रिया आपण समजतो तशी सरळ नाही - त्यात खूप गुंतागुंती आणि इतर स्तरांची सरमिसळ असते. ह्या सर्व मर्यादित जाणिवेला आपण "अर्धवट" म्हणतो. ती चूक नाही किंव्हा दोष नाही. तो एक गुण आहे परिणामाचा. त्याला कितपत खरे मानणे?!! म्हणजे कितपत स्वतःवर परिणाम करून घ्यावे?!!
तिथून श्रद्धेचा उगम होतो. कारण खोल आणि सूक्ष्म प्रकृती कशी वावरते हे उमगायला लागत. तरीही, ह्याला विषय समजू नये, जिचा चावा घ्यावा. ती गरज आहे सत्य होण्याची.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home