Saturday, August 10, 2024

श्री

 श्री 

 "मी" चा कुठलाही घटक निर्मितीच गुण घेऊन येत. म्हणून ते अनेक घटकांशी गुंतलेले असते आणि त्या स्तारांच्या गुंतण्यामुळे आपण स्मरण करतो ते वृत्तीच्या पोटी ते प्राण ते आकार. अश्या एकंदरीत पद्धतीने बुद्धी आणि भावनेचं रूप निर्माण होत आणि दृष्यावर किंव्हा इंद्रियांवर केंद्रित राहत. हा झाला "परिणाम" त्या शक्तीचा.

 घटक निर्माण करणे आणि अनेकात गुंतवणे आणि त्याला "मी" संबोधणे हे भगवंताच्या शक्तीच कार्य आहेत्याची इच्छा आहे. "कार्य" म्हणजे अनाकलनीय क्रिया जिथे शुध्द स्फूरणातून अनेक आकार जाणिवेत निर्माण होत राहतात. त्या क्रियेच्या परिणामामुळे आपण सूक्ष्म असलेले विश्व "जड" मानतो आणि ते भोगतो. 

 घटकांहून मी वेगळा आहेहे जाणिवेत येण्या करिता भगवंतच चिंतन महत्वाचं आहे.

 हरि ओम.

 

 

श्री 

 किती गुंतणेकष्यात आणि किती वेगातह्याने समाधान मिळेल कापरावलंबी असल्यामुळे संकल्प शाश्वत राहत नाही. विचारभावना आणि शब्द हे उगाचच मंडळी बडबड करायला वापरतातहे अपेक्षा ठेऊन की गोष्टी सुटतीलकिंव्हा स्पष्टता येईल. रागअहंअपेक्षादुःख हे त्यातील भावंडे आहेत. दृष्यावार परावलंबुन राहणे ही आपली वृत्ती पहिले शांत करायला हवी. सत्याच विस्मरण झाल्यामुळे भीती किंव्हा अहं वृत्ती निर्माण होतेज्याला "मी" ही संकल्पना चिकटते. जे कार्य आहे अस्तित्वाचं ते खूप गूढ किंव्हा गुपित आहे. त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. 

 अस्तीत्व हा भाव आहे. आपण अस्तित्वात असतो - हे मनात खोलवर रुजायला हवे. आणि अस्तीत्व म्हणलं तर सूक्ष्मशाश्वतस्वतंत्रशांत भाव. मागेआत्तापुढे हे संकल्पना आहेत किंव्हा अनुभव आहेत. 

 अनुभव म्हणजे नक्की तरी कायडोळ्या समोर असते तेकी विचार निर्माण करते तेकी मागे आणि पुढे येते तेकी काळजी निर्माण करते तेकी विचार चक्र आणि घटकांची क्रिया उत्पन्न करते ते

 शांत अनुभव हे बुद्धी किंव्हा ऐतिहासिक अभ्यासावर अवलंबून बहुदा नसावा. कष्यावरहीकुठल्याही घटक्यावरही किंव्हा संकल्पनेवर सुद्धाशांती भाव अवलंबून नाही. म्हणजे "असा विचार का आला" ह्यावर त्रासून जाण्यापेक्षा, "तसा विचार पलीकडून दिला गेला आहे" असे स्वीकारणे. विचार असे का यावेतहे कुणी सांगावे आणि त्यावरून मी का ठरून घ्यावे स्वतःला?!! विचारांचे येणे आणि जाणे ते सूर्याच्या उगम आणि अस्त होण्या सारखे आहेत. 

 अभ्यासाचा रोख perfect होण्यासाठी नसावा. तो निव्वळ शांत होण्यासाठी पाहिजे. 

 हरि ओम.

 

0 Comments:

Post a Comment

<< Home