Friday, August 30, 2024

श्री

 श्री 


प्रकट होण्याला एक स्वभाव असतो. त्या स्वभावापोटी जिवामध्ये विचार चक्र आणि भावना चक्र निर्माण होत राहतात आणि दृष्यशी संपर्कात आणतात आणि संबंध जोडतात. ही एक विलक्षण क्रिया आहे भगवंताची, त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या शक्तीची. ती क्रिया म्हणजे "होत राहणे" ! त्या होण्यामध्ये अनंत सूक्ष्म स्तर, स्थिती आणि परावलंबन असते. त्यातूनच "मी" होतो आणि "तुम्ही" होत राहतात (असे भासत राहते). त्या भासण्याला किंव्हा जाणीवाना "आपण" धरून राहतो आणि "अनुभव" पदरी पडत राहतात. म्हणजे "मी" किंव्हा "तुम्ही" काय; ही जाणिवेतून निर्माण झालेली संकल्पना आहे. अनंत प्रकारचे प्राण वावरत आणि संबंध जोडत अशी भूमिका तैयार होते. मग बदलांची गती दिसते, गुण येतात, स्वभाव असतो, आकारांशी संपर्क येत राहतात. ह्या दैवी क्रियेला सामोरं जायला लागतं. आपण होणे, त्यातूनच विधिलिखित आहे आणि अनंत अनुभवांना सामोरं जाणे ओघाने आलेच. 

म्हणून जितकं जास्ती सूक्ष्म होऊ, तितका "अट्टाहास आणि चिकटून राहणे" ही वृत्ती ( किंव्हा जीवाचा स्वभाव ) गळून पडू शकते. 

जाणीव गूढ असते. उत्तर बुद्धी शोधते. उत्तरांच्याही पलीकडे आपली समज असायला हवी. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home