Friday, August 30, 2024

श्री

 श्री 


गोष्टींचे पूर्ण अर्थ मनाच्या पलीकडे किंव्हा भगवंताच्या अस्तित्वात दडलेले असतात. तो आहे, म्हणून गोष्टी होणे, आकारास येणे, संकल्पना राहणे, इतरांमध्ये गुंतत राहणे, बदलणे, परिणाम होत राहणे ह्या सर्व घडामोडींना चालना मिळत राहते. _होणे_ ही क्रिया आहे अस्तित्वाची. त्यात खूप काही परिवर्तन होत आणि अनेक स्तरात त्याचे परसाड उमटतात. त्यातील काही स्तर सूक्ष्म स्वरूपाचे/ स्वभावाचे असतात तर काही अधिक स्थूल स्वरूपाचे. आणि हे सर्व गुंतलेले असतात. त्यातील गूढपण हे आहे की "गुंतणे" हा शब्द _विश्लेषण_ आहे, सरळ मार्गाची दोरी नाही. म्हणून गुंतणे कसे असते, हे अनुभवायला लागते जाणीवेच्या भाषेतून, तरच त्यावर श्रद्धा बसते. 

तो मार्ग आहे वृत्ती शांत करण्याचा. दुसऱ्या भाषेत अंतर्मुख होण्याचा. तिसऱ्या भाषेत अधिक सूक्ष्म होत राहण्याचा. 

इंद्रियापासून आपण वावरतो ही खूप स्थूल पद्धत झाली, ज्यात विचार, भावना आणि तीन गुणांचा प्रभाव आला आणि तसे अनुभव आले आणि तसे आकार दिसत राहिले. ते म्हणजे "मी" नाही (किंव्हा एक मर्यादित चौकट आहे). भगवत वस्तू इंद्रियगोचर नाही. म्हणून ती जाणून घेण्यास एक विशिष्ट क्रिया जोपासायला लागते. ती म्हणजे नामस्मरण. 

इंद्रिय किंव्हा त्याचा परिणाम पाडून घेणे ही मर्यादित राहण्याची स्थिती आहे. जाणीवाना अंत नाही. जाणीव इंद्रियांच्या अधिक सूक्ष्म होऊ शकते. सर्वात सूक्ष्म जाणीव आहे ती भगवंताची. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home