Saturday, July 19, 2025

श्री

 श्री 


एखादी व्यक्ती खूप आजारी असली, की तिच्याशी काय आणि कसे बोलावे, हा मला पडलेला एक अवघड प्रश्न आहे. कारण, कुठेतरी माहीत असते की आपण कितीही केलं, काहीही केलं तरी त्याचा शेवट, जे अटळ आहे, ते होणार आहे...काही व्यक्तींशी आपले संबंध खूप खोलवर, सूक्ष्मातून जाणवलेले असतात, म्हणून अशा व्यक्तींचे हाल आपल्याला बघवत नाही. त्यातून मार्ग कसा काढावा असा काहीसा प्रश्न डोक्यात रुजू होतो. मग आपण ती वेदना टाळण्याचा प्रयत्न करतो... कामात झोकून देतो, कमीत कमी त्याच व्यक्तीशी बोलतो, कारण प्रत्येक शब्द, नजर ही आघात केल्यासारखी वाटते. 

२ वर्ष असे करून, मग विचार आला की ह्याने साध्य काय होणार आहे मला आणि त्या व्यक्तीला? मी तर खूप कष्टी होणार, खंत निर्माण होणार आणि आणखीनच बोचरे भावना निर्माण होणार. त्यातून सोलून निघाल्यावर असा काहीसा मतितार्थ निघायला लागला की आपण शांत व्हावे. त्या व्यक्तीला जसे जमेल तसे वेळ द्यावे, विचारपूस करावे, मोकळे मनाने बोलावे, आठवणी सांगावे. जे होणार आहे, ते होतच राहणार आहे. ह्या घडामोडींना कुणीच जबाबदार नसतं. सगळ्या गोष्टीना माफ करावे, स्वतःला सुद्धा (जे अवघड असते). आपण माणूस आहोत ह्याचे भान ठेवून, मर्यादा असायचेच, तरीही शांत रहावे. 

सध्या माझ्या जीवनात असे ३ सर्वात जवळचे व्यक्ती आहेत, ज्यांचा माझ्या मनावर प्रभाव जबरदस्त होतो. खूप दुःख होऊन सुद्धा, मनात राग न आणता, प्रेम करत राहणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे, अत्यंत अवघड...की ते कुणाला सांगताही येत नाही, ते जे काही ओझ असतं, ते आपल्याला नेऊ जायला लागतं. हे कोड बुद्धीने सोडवता येत नाही. 

त्यासाठी वेगळीच क्रिया लागते. कदाचित त्याचे उत्तरे अध्यात्म मध्ये असावेत... उत्तरं लगेच मिळत नसतात. ते सैय्यम वाढवून कळायला लागतात. आणि ही आहे माझी अग्नी परीक्षा.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home