श्री
श्री
सत्य स्मरण, शक्ती आणि मी, ह्या जाणिवे मध्ये फरक राहत नाही.
सध्या स्मरण मनाशी निगडित आहे - म्हणजे ते एक क्रियेने निर्माण होत राहते, जी वासनेतून ते प्राण चक्र ते आकार चक्र ते परत आतील वासना, अशी सतत प्रज्वलित राहते. त्याचा एकंदरीत परिणाम म्हणजे द्वैतमय जग आणि वेगळेपण, तात्पुरतेपण आणि त्यातून निर्माण होत राहणाऱ्या असंख्य भावना. हे सध्याचे स्पंदन आणि त्यातून होणारे संबंधांचे जाळ.
वेगळेपण खूप सूक्ष्म स्थितून आकारास येते म्हणून सर्व काही विघटित, वेगळे, प्रतिक्रियात्मक उद्भवत राहते. शांत होणे म्हणजे ही क्रिया मंदावणे आणि सर्व काही एकच आहे, अशी प्रचिती होणे.
अभ्यास जो आहे, तो ह्याचा आहे आपल्याला. दुसऱ्यांचा हेतू नेमकं काय असतो, ह्याचा विचार मनात असू नये. हेतू आपण मनोरचनाशी निगडित ठरवतो. म्हणून तो अस्थिर राहतो. भोग किंव्हा वस्तूवर किंव्हा प्रारब्धावर हेतू स्थित करणे, म्हणजे त्रासाला आमंत्रण देत राहणे.
म्हणून आपण स्थिर कसे होऊ शकू हे ओळखावे. स्थिर होण्यामध्ये "मी" हा भाव राहत नाही, हे ही ध्यानात ठेवावे. म्हणजे परिस्थितीवर "मी" ही व्याख्या अवलंबून ठेवत नाही आपण. म्हणजे सत्य भाव आणि परिस्थिती मध्ये _अंतर_ असते. ते अंतर कमी करत रहाण्याचे रसायन आहे नामस्मरण.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home