Thursday, July 10, 2025

श्री

 श्री 


विचार, ही क्रिया आणि कार्य,  कशी उद्भवते, हे गूढ प्रकरण आहे. जेवढं आपण स्वच्छ मनाने "विचारांचा" स्वीकार करू, तेवढं आपलं जगणं शांतीने होऊ शकत. 

विचार, त्याच्या बरोबर, खूप घटक घेऊन येतात...जसे की साखळी, संबंध, बदल, रूप, क्रिया, आकार, भाव, स्मरण, संवादाचे स्वरूप, संकल्पना कुठल्याही गोष्टीची, प्रतिक्रिया वगैरे. 

जसा सूर्य अस्तित्वात असतो आणि त्यातून अनेक गोष्टी घडतात, त्या प्रमाणे विचारांकडे बघावे. सूर्य का असतो, असा कुतूहल म्हणून प्रश्न विचारावा. तसंच विचारांच्या आस्तित्व, ह्या बद्दल कुतूहल बाळगावे. अस्तित्व ही विलक्षण क्रिया आहे, आणि ते निरहेतू पद्धतीने त्याकडे जाणून घ्यायला लागते. _असण्याला_ हेतू नाही. हेतू म्हणलं तर स्थळ आणि काळाची परिभाषा त्यावर उमटली केली गेली.  निरहेतू म्हणजे त्या पलीकडे...

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home