Wednesday, July 16, 2025

श्री

 श्री 


संबंध सर्वांशी, सर्व हालचालींशी, सर्व रुपांशी, सर्व आकारांशी, सर्व स्थितींशी, *सर्व शक्तींशी* येणारच. तो अस्तित्वाचा गुण धर्म आहे. 

आपण कृतीत आपले प्रयत्न करत राहायला हरकत नाही. त्यात सत्याचे स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्यात प्रत्येक घटक कृती करण्याच्या मागे आहे आणि शोधाच्याही आणि संबंध जोडण्याच्याही. हे सर्व स्वतःच्या जाणिवेतून (शक्तीतून) प्रकट होते. एकंदरीत कृती, संबंध आणि शोध हे एकात एक संबंधित असते. म्हणून त्या पद्धतीने सर्व भावनांचा ऊहापोह अनुभवात येत राहतो. 

शुद्ध होणे ह्या वरील सर्व हालचालींचे उद्देश आहे, कारण कृती काय, संबंध काय किंव्हा शोध काय - सर्व गुढत्व दर्शवते - त्याला तात्पुरतेपणातून आलेला आपला स्वार्थी हेतू संबंधित आणू नये. स्वार्थीपणा, बहिर्मुकपणा, देहपण हे सर्व भाव शांत होऊ द्यावे लागतात. आपण प्रमाण (जाणिवेची स्थिती) कशाला मानतो, ह्यावर सर्व ठरतं. प्रमाण देह, प्राण, वासना किंव्हा आत्मा ह्यातील काहीही होऊ शकतं. अर्थात देह सर्वात स्थूल आणि तात्पुरता, तर आत्मा सर्वात विशाल, स्थिर आणि सूक्ष्म असतो. 

दृश्याचा निर्हेतु सूक्ष्म स्वभाव किंव्हा संबंध जाणवण्यासाठी आपण स्वतः शुद्ध होणे गरजेचे आहे. लोकांच्या व्यवहाराचे कारण किंव्हा त्या हालचालींचे अस्तित्व आणि उद्देश आपल्या पूर्ण कळत नाही, म्हणून त्याने कष्टी होण्याची गरज नसते. सर्व भगवंताची इच्छा आहे, असे स्वीकारून, योग्य कार्य करत राहावे आणि आनंदी रहावे.

देह ते आत्मा जाणवण्याचा प्रवास म्हणजे नामस्मरण करत राहण्याचा. 

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home