श्री
श्री
संबंधांचे स्वरूप _गूढ पद्धतीने निर्माण_ होत राहते. अस्तित्व तसे कार्य करणार. आपण कसे होतो आणि आपल्या वाट्याला कुठले संबंध कशा पद्धतीने सामोरे येतात, ह्याची चिंता करू नये. संबंधांचे मूळ भगवंताच्या इच्छे मध्ये आहे, होण्या मध्ये आहे, असण्या मध्ये आहे...त्यात काही क्रियेतून "मी" हा भाव होतो आणि त्यातून चिंता आणि गुंतून राहणे. माझे होणे आणि जाणीव खूप गूढ क्रियेतून आलेली आहे, म्हणून सर्व काही भगवंत ठरवतो.
दररोजच्या जीवनात त्याचा अर्थ काय, ही शोध मोहीम झाली. त्याला आपण शांतीचा शोध (शांतीच्या अस्तित्वाची जाणीव), असे म्हणू शकतो. परिस्थिती कशीही जरी असली, तरी शांती असतेच. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत वावरून सुद्धा, शांती मनात संक्रांत होऊ शकते. आणि ते होणे म्हणजे संबंधांचे स्वरूप आपुलकीचे होणे. आकार महत्त्वाचा नाही, त्याच्याशी संबंध कसा होतो, ते महत्त्वाचं आहे. संबंध जसा शुद्ध होतो, निरहेतू होतो, तसा आकाराशी असलेलं नातं किंव्हा भाव शांत होतो, निरपेक्षित होतो, स्वस्थ चित्त होतो. मुळात आपल्या स्वतःशी असलेला संबंध शांत होतो.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home