Monday, July 21, 2025

श्री

श्री 

गुळ ठेवला अस्तित्वात, की मुंगळ्या लागल्या. म्हणजे कुठलेही कार्य केले, की त्याचे परिणाम ते होणार. किंबहुना कार्य हे परिणाम होण्यासाठीच असते अस्तित्वात. 

हेतू आणला मनात, की कार्य होणार, त्याचे परिणाम असणार, संबंध निर्माण होणार. 

नामाची आठवण केली, की त्या प्रमाणे कार्य होईल, परिवर्तन होईल, दर्शन घडेल, शांती लाभेल. नामाचा नेम धरणे महत्वाचे आहे. ह्याचा उल्लेख हरि पाठ मध्ये केला आहे. शक्तीचे कार्य आणि जागे होणे, ह्या दोन्ही गोष्टी नाम घेऊन साधल्या जातात. 

आपला मार्ग कार्य करण्याचा आहे आणि त्यातून भगवंताकडे जाण्याचा आहे. कार्य करण्यास टाळू नये.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home