श्री
श्री
मला ठामपणे काही तसे माहित नाही - कारण निर्मिती क्रियेमुळे सर्व काही बदलणारे असते, संबंधित असते, स्थळ आणि काळाच्या चौकटीत वावरत राहते, ते येते आणि जाते, ते प्रवाह दर्शवते वगैरे. ह्या सर्व गोष्टींना विश्व भाव संबोधले आहे. "भाव" म्हणजे कार्य आणि जाणीव आणि चक्र ह्या प्रामुख्याने तीन घटक त्यात असावेत.... _स्मरण_ (किंव्हा होत राहणे एका विशिष्ठ पद्धतीने).
हा विश्व भाव अस्तित्वाच्या कार्यात असतोच. त्या भावात, शांती रस संक्रांत होणे आपला मार्ग असतो.
विश्व भावाचा परिणाम मनावर होत असतो, म्हणून त्यातून विघटन, साखळी, संबंधांचे प्रकार, स्तर, चक्र, विचार, भावना, विषय, प्रश्न असे अनुभवात होणारे घटक वावरत राहतात. ह्या घटकांना "मी" म्हणतो. विघटित रूप आणि आकार एकमेकांच्या संबंधात येतात आणि गुंतून राहतात. ह्या क्रियेचे परिणाम किंव्हा होणारी भावना आहे तात्पुरतेपण, वेगळेपण, भीती, अर्धवटपणा.
ह्यातून मोकळे होण्यासाठी जाणीव शुद्ध करणे आहे, जे नामस्मरणातून होऊ शकते.
हेतूच्या पलीकडे होणे, म्हणजे स्थिर होणे आहे. गोष्टी योग्यच होतात, आपल्याला कितीही विघटन दिसले तरीही, त्यातून कितीही चिंता झाली तरीही, कितीही विषय सोडवण्याची खुमखुमी उत्पन्न झाली तरीही.
सर्व भगवंताचा खेळ आहे, त्याची इच्छा आहे, तो आहे इथे, त्याचे राज्य आहे, त्याचे कार्य आहे. लोकांचे दिसणे, वागणे, व्यवहार - ह्याची चिंता "सोडून द्यावी". ज्या विचारांच्या साखळीमुळे चिंता होते, _ती साखळी शिथिल करत रहावी_.
_साखळी_ ह्या क्रियेतून "संकल्पना" होते संबंधांची किंव्हा अस्तित्वाची. म्हणून साखळी बदलावी आणि शांती रस स्थित करावे.
हरि ओम.
श्री
विघटन सगळीकडे बघून, कप्पे बघून, बोलणे ऐकून, व्याकुळ होऊ नये किंव्हा चिंतातुर भावना सोडवण्याचा प्रयत्न असू नये. सध्याच्या परिस्थितीमुळे भावना चिंतित होतील, संबंध व्याकुळ करतील, स्पष्टता मांडता येणार नाही आणि मतभेद जास्त प्रमाणात असतील. All of these are signs of fragmentation and individualism. आत्ताच्या काळाची "दिशा" तशी काहीशी दर्शवत आहे.
त्यावरून आपल्यावर आघात होत राहणार. आघात होणे अटळ आहे, पण त्यात किती गुंतून रहावे, हे आपल्या जाणिवेवर ठरवता येते. काही सत्य विधान पचवायला लागतात, की कुणी कुणासाठी पुरक नसते. कुठलीही गोष्ट कायम नसते, शाश्वती देत नाही. आपण जसे आलो, तसे जाणार आहोत. आपल्या हातात पूर्ण काहीच नसते. सर्व भगवंत कार्य करतो, म्हणून त्याच्या असण्यावर श्रद्धा ठेवावी. प्रपंचात हेतू ठेवू नये. जे येईल, ते स्वीकारावे. जे जाईल, ते जाऊ द्यावे. जे बदलत राहील, ते बदलू द्यावे. गोष्टी शांतीकडेच जात राहतात, त्याचा दृश्यावर होणारा परिणाम गूढ असतो. शांती रसावर श्रद्धा ठेवणे. तिला मनात संक्रांत करता येते. तिच्यावर सर्वात जास्ती लक्ष द्यावे.
हरि ओम.
श्री
आपले रूप जरी मर्यादित असले, तरीही त्यातून अंतर्मुख परावृत्त करणारे बरेच घटक दिलेले असतात, जसे की विचार, भावना वगैरे. म्हणजे प्रस्थापित झालेल्या रूपातून आपण स्वतः विलीन होऊ शकतो आणि सत्याचा शोध आत्मसात करू शकतो. अर्थात हा प्रवास झाला आपला आणि त्याचा मार्ग रुपातूनच निर्माण करणे आले.
म्हणजे अंतर्मुख होणे ही नैसर्गिक बाब मानावी रुपाची. त्याचे घटक असावेत traditions, patterns, continuations, introspections, doubts, expressions, surrendering and so on. ह्याकडे निश्चित लक्ष केंद्रित होणे आहे प्रत्येकाचे...आज किंव्हा उद्या. की आपण बिंदू नसून, प्रवाह आहोत. प्रत्येकाचा प्रवास आहे. प्रवास दिलेला आहे. प्रवासाला भगवंताची इच्छा मानावी. म्हणून रूप कायम कसे राहील असा विचार करण्यापेक्षा, रुपात परिवर्तन होईलच आपल्या हितासाठी, असा विचार करावे.
हरि ओम.
ReplyForward Add reaction |
posted by niranjan at 10:39 PM
0 Comments:
Post a Comment
<< Home