Monday, May 25, 2026

श्री

  

श्री 

 संवादाला महत्व असते नकळत. एक तर श्रद्धा असावी की जे काही होत आहेजे काही घडेलजे काही आपण करणार असतोजे काही ध्यानी येत राहतेते योग्य असते आणि आपल्या हितासाठी असते. मग त्यात चर्चाभेदशांत बसणेबदलसंबंधचिंता - सर्व काही त्यात येते. 

 गोष्टींच्या _होण्याला_, जो काही काळ अस्तित्व मागतोतो देणे गरजेचे असते. मग त्यात जन्म,मरणजीर्ण होणेप्रगतीबदल ह्या सर्व गोष्टी आल्या.  गोष्टींच्या हालचाली सूक्ष्मातून स्थूल स्थितीत _अवतरतराहतात आणि गडपही होत राहतात आणि हे कार्य भगवंताची शक्ती करते. म्हणून _हालचालीयोग्यच असतात आणि त्याच्या इच्छेने होत राहतात. 

 श्रद्धा वाढवावी प्रवासात. पुढे काय लिहून ठेवले आहेकाय होईलकसे होईलकाय देणे लागतेकुठे जायला लागतेकसा हेलपाटा पडू शकतो - सारे काही त्याच्या भरवसावर सोपवणे. आत्मसात होण्याच्या क्रियेला देखील देणे लागते अस्तित्वाला आणि ते द्यावे. 

 होणे - हे कार्य असते - ज्यात आपण फक्त देतो. ते बुद्धीवर निर्भर नसते - त्याच्याही पलीकडे स्थित असतेम्हणून होण्याच्या कार्यक्षमतेला भगवंताची शक्ती कारण ठरतेबुद्धी नाही. बुद्धीने जे काही संक्रांत होते (speculation), त्याच्याही पलीकडे अस्तित्व शक्ती कार्य करत राहते. एखादी गोष्ट होणेह्याला घाबरण्याचे काय कारण असतेआपली श्रद्धा किंव्हा शुद्ध जाणीव कमी पडते. म्हणून श्रद्धा वाढवणे. 

 हरि ओम.

 

 श्री 

 ओळखण्याचा प्रश्नच येत नाही. मी कोण आहेकाय करतोकुठे जाणार असतोकाय वाटते वगैरे - हे कुणाला पटवण्यासाठी नसते. मी कुठून येतोहे मलाही ठाऊक नाहीतर त्या बद्दल अडून राहण्यात काय तथ्य असते?!! तरीही लोकं एकमेकांचे झिंझ्या उपटण्यात कमी करत नाही! 

 प्रवास कसा असतोहे पूर्णपणे माहित नाही. प्रवास म्हणजेच भगवंताने आखलेला किंव्हा त्याच्या इच्छेने संक्रांत होत राहणार. प्रत्यक्षात परिस्थिती येत राहते. तिला सामोरे जायला लागतेत्यात दुमत नाही. आपल्या ध्यानी गोष्टींचा प्रवाह स्थित असणार. 

 हरि ओम.

 

 Shree 

 Emphasis to solve a problem at any cost may  imply a disconnect with surrounding concerns or less faith in deriving lessons from what the environment seems to say. 

 Why does this happen?! Not very sure of this....I don't wish to assume a deterministic stance since it is quite useless and what's the harm in admitting and accepting that there are far subtle forces at play which can't be even known by a thought! 

 It is not for us to solve any problem. A problem is a creation of the mind and how it gets defined how it gets engaged with and what outcome comes from it. It is never ending. A problem is a fictional idea. 

 The journey that has been inherited includes many problems. But that needn't define us. The problem requires to be seen. It doesn't indicate that there has to be an answer or one should force oneself to find out one.

 Hari Om.

 

0 Comments:

Post a Comment

<< Home