Shree
Shree
Almost everyone of us thinks that "a job is required
to be done"... म्हणजे काहीही होऊ द्यावे, ही गोष्ट व्हायलाच
पाहिजे!
काही काळा पूर्वी, मलाही तसेच वाटायचे की काम होणे गरजेचे आहे. बहुतेक
लहानपणी हेतू सोप्पा असावा, म्हणून खूप प्रश्न येत नसावे!
आता जसा हेतू क्लिष्ट होतो, तसे अनेक प्रश्न
येतात आणि खूप विचार निर्माण करत राहतात, की हे का,
आत्ता का, असेच का, इथेच का,
नंतर का नाही, असे का नाही, वगैरे.
मूळ प्रश्न असा आहे, की सिद्ध होण्यासाठी हेतू असतो का?
की _गोष्टी एका पद्धतीने असायला हवे, किंव्हा हालचाली
अश्याच असायला हव्या_ अशी जाणीव झाली असते का आपली?
दररोजच्या अनुभवात असे सरळ दिसते की वरची अपेक्षा ठेवून गोष्टींचे वावर तसे
असत नाही. इथे मग सरळ निष्कर्ष होतो की गोष्टी, हालचाली,
संबंध, ध्यान हे अद्भुत असते किंव्हा _गूढ कार्यातून
प्रस्थापित होते_. आपले होणे, असणे,
बदलणे, निघून जाणे - हे ही त्या गुढतेत होत राहते. मग
एखाद्या वासनेला का धरून रहावे? आणि
"धरणे" अशी वृत्ती तरी का उदयास येते? त्यावरून अनुभव,
भोग, परिणाम का झेलायला लागतात?
आणि ही वृत्ती मनाला लावून घ्यायची असते का, की त्याला नैसर्गिक
मानायचे असते की तटस्थपणे बघायचे असते?
काहीही बोलण्यात किंव्हा स्पष्टीकरण देण्यात तथ्य नसावा! असा प्रश्न आला,
की ओळखावा की हा खूप मोठ्ठा क्षण असतो पचवण्यासाठी. ह्या प्रश्नाने व्याकुळता
येऊ शकते आणि सर्व प्रकारे शंकाने घेरून जाऊ शकते.
तिथे सत्याच्या शोधाचा निश्चय होतो. कोण आहे "मी"?
हा भाव कसा होतो, कुठून येतो, काय करतो,
कुठे जातो, का होतो?
ह्या प्रश्नाकडे पोहोचायला, खूप जन्मो जन्मीच्या
अनुभवातून जाणे होते. तसा प्रवास अटळ समजावा. मग पुढेही प्रवासावर श्रद्धा ठेवून
सत्याकडे पोहोचू, नाही का?
लोकांची चूक अशी होते, की शांत होणे म्हणजे काहीच प्रतिकार करू नये किंव्हा
इच्छा बाळगू नये. तसा तो अर्थ नाही. देह असल्यामुळे, अर्थातच त्याच्या
काही मागण्या असतील. मग त्यात प्रतिकार, इच्छा सर्व आल्या.
त्यात फक्त वाहून जाण्याची गरज नाही किंव्हा त्याचे संस्कार मनाला चिटकवण्याची गरज
नाही. रूप आहे, देह आहे तर अनुभवाचे स्थान असणार. त्याला टप्पा मानून
कर्तव्य करावे.
हरि ओम.
श्री
सर्व विचारात, भावनेत, संबंधात गुंतून
राहण्यात आणि त्यातून सिद्ध होण्यात काहीही गरज नसते. लोकं काहीही बोलत राहतील,
हालचाली कसेही होतील, पण त्याने आपण ठरत नसतो. रूपाचे आणि आकाराचा स्वभाव
असतो, म्हणून त्या पद्धतीने प्रारब्ध होणार. प्रारब्ध
म्हणजे "मी" नाही. आणि म्हणून मन सूक्ष्म स्तरात _परिवर्तित_
होऊन सत्य आत्मसात करू शकते.
इथे परिवर्तन सर्वांगीण अभिप्रेत आहे आणि साखळी सारखे नाही,
किंव्हा जर - तर नाही, किंव्हा फक्त बौद्धिक नाही. म्हणून सत्य आणि त्यातून
वासनेचे स्थान गूढ असते आणि त्यासाठी भगवंताचे चिंतन सतत जागृत ठेवायला लागते. चिंतन
आणि दृश्यात होणाऱ्या हालचाली - _ह्याचे संबंध जोडू
नये_.
भगवंत कार्य करत दृश्य अनुभवात आणतो. आपण नाम घेत भगवंताकडे पोहोचावे. दोन्ही
एकाच वेळेला स्वतंत्र होणाऱ्या गोष्टी मानाव्या.
हरि ओम.
श्री
दृश्य, हे आपल्या रूपातून _संबंधित_
येते किंव्हा ध्यानात येते. There is an idea of subjectivity
here. त्याला टप्पा मानून स्थिर होण्याची गरज आहे जीवाला. हे होण्यास "मार्ग
निवडण्याचे" महत्व सुचविले आहे. आपल्या मनाला दोन गोष्टींची खेच असणार आहे -
दृश्य किंव्हा बहिर्मुख स्वभाव/ तसे स्मरण/ तशी कृती/ तसा भाव/ तशी साखळी/ तसे
चक्र....आणि भगवंताची शक्ती/ शांती भाव/ सूक्ष्म स्तर/ सत्य/ स्थिर/ अद्वैत/
अदृश्य...
विचार आणि भावना हे बहिर्मुख छटा दर्शवतात किंव्हा त्या प्रमाणे दृश्यात
बांधले जातात आणि तसे हालचाली करत राहतात आणि परिणाम भोगायला लावतात. एकंदरीत,
ह्याला "विघटित" अस्तित्व म्हणू. ह्यात वासनेचे स्थान प्रस्थापित
असते. भगवंताचे विस्मरण झालेले असते आणि त्या सूक्ष्माचा परिणाम दृश्यात कसा होतो,
हे विचारांना ओळखणे कठीण जाते, म्हणून भीती निर्माण
होते. जो पर्यंत आपण परावलंबित वावरतो, तो पर्यंत तसे
परिणाम भोगायला लागतात.
ह्यातूनच भगवंताचे सतत नामस्मरण करत राहायला लागते,
म्हणजे तसे संस्कार मनात रुजू होऊ पाहतात आणि मन स्थिर आणि सूक्ष्म व्हायला
लागते. _संस्कार संक्रांत_ होऊ देणे इथे अभिप्रेत आहे. म्हणजे गूढ पद्धतीने
परिवर्तन होणे. ते अट्टाहासाने फक्त होणे अवघड. म्हणून इथे प्रयत्न,
श्रद्धा आणि कृपा ह्यांची गरज लागते. कृपा म्हणजे योग्य परिवर्तन होणे
भगवंताच्या इच्छेतून.
श्रद्धा ह्याचे स्थान दृश्यात अवलंबून नसते. म्हणून काहीही होऊ द्यावे,
भगवंताचे चिंतन सोडू नये. त्यावरून श्रद्धेचे उगम होते.
हरि ओम.
श्री
निवांतपणा किंव्हा स्वस्थता आपल्या आकलनाच्याही पलीकडे होऊ शकते,
काही सांगता येत नाही. आणि ते सांगणे कठीण, हेच हिताचे असते
(म्हणजे त्यावर कुणाचाही ताबा नाही)!...
माझ्या मते, परावलंबित भाव विलीन होऊ देणे आणि त्या प्रमाणे विचारही,
हे मोलाचे ठरेल. म्हणजे "विचार करण्याची गरज न उदयास येणे". ह्यातून
हे कळेल की जीव म्हणलं तर _त्या स्वरूपाचे विचार आणि स्मरण होते_. अस्तित्व माध्यमात
वासना टाकली गेली की रूप आणि देह आलेच म्हणून समजा! म्हणून शुद्ध होणे ह्याचा अर्थ
की वासना पूर्ण विलीन होणे आणि केवळ अस्तित्व माध्यम स्थित असणे.
अस्तित्व भाव, जो आपण जाणतो, तो मर्यादित आणि
परावलंबित असतो. त्यावरून विचार, भावना,
प्रश्न, कोडी मांडले जात राहतात आणि त्यावरून व्यवहार होतो
आणि परिणाम _भोगला_ जातो.
म्हणून विचार विलीन होऊ द्यावे लागतात, किंव्हा जाणीव शुद्ध
आणि सत्य होऊ द्यावी लागते. मूळ प्रकार जाणिवेचा आहे,
विचारांचा "नाही".
येत्या काळात खूप काही गोष्टी, खूप प्रमाणात विघटित
होणाऱ्या दिसत आहेत....इतके की आपण बाहेरही फेकले जाऊ शकू किंवा आपली हाक इतरांना
ऐकू तरी येईल का, हा प्रश्न निर्माण व्हावा. अध्यात्म मध्ये असे
म्हणतात की एका म्यानात दोन तलवारी राहणे कठीण (शांती भाव किंवा विघटित अहं
वृत्ती). तसेच येणारा काळ तेच सांगतो की अजून विघटित व्हावे का सत्यात विलीन होणे?!
विघटन सोडावे लागणार आहे, आणि हे तेव्हा शक्य
होईल, जेव्हा समाधान शांती भाव स्थित होईल आपल्या ध्यानात.
हरि ओम.
Shree
The question or anything for that matter, always appears
a "dot" that represents a fixed form in space and time (रूप आणि देह).
आपल्या दृष्टीने सध्या "संबंध" तसेच होऊ पाहतात,
म्हणून त्याची बाधा होते, हालचालींचे परिणाम
होतात. एकंदरीत, ह्याला "घट्ट धरून राहणे" असे म्हणतात.
As things or any question is taken deeper within, more
connections, relations, and subjectivity are revealed embedded in the question
itself. So therefore one suspends labelling a question, because while engaging
with it, more things get revealed in subtle states.
Hence decoding, analysis and synthesis are to reveal such
states. The ability to engage intensely with a problem to an extent that it
"dissolves" is a human capacity.
Hence a problem is a state of human mind that has chosen
to latch onto it. The problem as an experience of Truth, *doesn't really
exist*. It has been brought to existence by the mind....
If i am able to "see" a problem as a state of
mind (rather than feelings compelled to solve it), then maybe a different approach
to engage with it, may begin. The problem may not be a dot, but a flow or a web
or subjective or highly malleable.
Also as the problem changes its shape or nature,
ourconnections with all intangible and tangible things also _change_ at the
same time. This means a problem that is properly decoded or dissolved may also
dissolve connected knots of the past and the future. In essence, it can turn
out to be a healing process.
Hari Om.

0 Comments:
Post a Comment
<< Home